बुलढाणा: मेहकर तालुक्यातील देऊळगाव माळी बसस्थानक परिसरात उभ्या चारचाकी वाहनातून तब्बल ९ लाखांची रक्कम अज्ञात चोरट्यानी लंपास केली. आज शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेत, गाडी उभी करून मित्रासह चहा पिण्यासाठी जाणे एका शिक्षकाला चांगलेच महागात पडले. संतोष मदनलाल लद्दड असे शिक्षकाचे नाव असून त्यांनी आज मेहकर येथील स्टेट बँक शाखेतून ९ लाख रुपयांची रक्कम काढली. त्यांनतर दोघा अज्ञातांनी त्यांच्या चारचाकीचा बेमालूमपणे दुचाकीने पाठलाग सुरू केला .

हेही वाचा : राहुल गांधी यांची ओबीसींवर टीका, बावनकुळे म्हणाले “…तर काँग्रेस संपून जाईल”

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rbi governor shaktikanta das on inflation risks and slowing growth
चलनवाढीसह विकासवेग मंदावण्याचा धोका ; शक्तिकांत दास
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Cook on Chief Minister Varsha bungalow Arvi constituency
मुख्यमंत्र्यांच्या वर्षां बंगल्यावरील खानसामा ‘ ईथे ‘ काय करतोय ?
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक

देऊळगाव माळी येथे मित्रांसोबत चहा पिण्यासाठी गेले असता त्यांनी गाडीत ठेवलेली रोकड अज्ञातांनी पळवली. हा प्रकार लक्षात येताच संतोष लद्दड हादरले. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासले असता, दुचाकीस्वार दिसून आले. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मेहकर पोलीस ठाण्याचे राजेश शिंगोटे करत आहेत. इतरत्र नाकाबंदी करण्यात आल्याचे सांगण्यात आले.