बुलढाणा : अवघ्या विशीत त्यांना ‘शस्त्रांचा’ मोह जडला अन खरीखुरची शस्त्रे मिळणे कठीण, म्हणून त्यांनी हुबेहूब दिसणारी ‘शस्त्रे’ चोरली… लवकर पकडल्या गेले नाही म्हणून हाती ही ‘शस्त्रे’ घेऊन ते वळण मार्गावर फिरत होते. नेमकी हीच घोडचूक त्यांना भोवली अन ते पोलिसांच्या जाळ्यात अलगद अडकले. रोशनसिंह टाक (२०) व हीरासिंग मोहनसिंग बावरे (१९) अशी आरोपींची नावे असून ते दोघे देऊळगाव राजा शहरातील रहिवासी आहेत.

त्यांच्याकडून देऊळगाव राजा पोलिसांनी ८ एअर रायफल व २२ एअर पिस्टल जप्त केले आहे. देऊळगाव राजा येथील रविंद्र धन्नावत यांच्या पिस्टल विक्रीच्या दुकानातुन १६ ऑक्टोबर २०२३रोजी ८ एअर रायफल व २२ पिस्टल चोरी गेल्याची तक्रार तक्रार देऊळगाव राजा पोलीस ठाण्याला देण्यात आली होती. पोलिसांनी भादवीच्या कलम ४६१, ३८०, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.

Karnataka man return to india from russia
“आम्ही भारतात जिवंत परत येऊ असं वाटलं नव्हतं”; रशिया-युक्रेन युद्धात लढलेल्या कर्नाटकच्या तिघांनी सांगितली आपबीती!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Prajwal Revanna Rape Victime
Prajwal Revanna Chargesheet: ‘बलात्कार करताना पीडितेला हसायला सांगायचा’, प्रज्ज्वल रेवण्णाच्या विकृतीचा कळस
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
vladimir putin in touch with india china brazil over ukraine war
अन्वयार्थ : पुतिन यांचे ‘मित्र’ !
Special modak making classes for visually impaired women
हात जेव्हा डोळे होतात…
children, studies, loksatta news,
सांदीत सापडलेले…! : मदत?
Suicide in uttarpradesh
Man Suicide in UP : “आयुष्यात हवं ते करा पण लग्न करू नका” म्हणत तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या!

हेही वाचा : उपराजधानीत अनैतिक संबंधातून सर्वाधिक हत्याकांड, ६९ पैकी ३४ खूनांमध्ये प्रेमप्रकरण आणि विवाहबाह्य संबंध

तपास चक्रे फिरली

‘एसडीपीओ’ अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनात देऊळगाव राजा पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र लवकर सुगावा लागला नाही. यामुळे चोरटे निर्धास्त झाले . दरम्यान २७ नोव्हेंबर रोजी दोन युवक बायपास वर एअर रायफल व पिस्टल सह फिरत असल्याची माहिती मिळाल्यावर त्यांना अटक करण्यात आली. मंगळवारी त्यांच्याकडून उर्वरित ‘शस्त्रे’ जप्त करण्यात आली. याची किंमत १ लाख २७ हजार इतकी आहे. पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत चिरडे, दत्ता नरवाडे, रामकिसन गिते, भगवान नागरे, विश्वनाथ काकड, माधव कुटे, गणेश जायभाये, सैयद मुसा, अनिल देशमुख, शितल नांदे, सुभाष मुंढे व विजय दराडे यांनी ही कार्यवाही केली.