बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपीटीने काल रविवारी रात्री थैमान घातले. यादरम्यान २० मेंढ्या दगावल्या. खामगाव तालुक्याला अवकाळी पावसाचा फटका बसला. यामुळे रब्बी पिके, कपाशीचे अतोनात नुकसान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : वृद्ध कलावंतांचे कडाक्याच्या थंडीत आंदोलन; निवड समिती स्थापन करण्याची मागणी

तालुक्यातील शिराळा येथे अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे सैलानी कृष्णाजी हटकर यांच्या वीस मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. त्यामुळे धनगर बांधव हवालदिल झाले आहे. नुकसान भरपाईची हटकर यांनी मागणी केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana at khamgaon taluka 20 sheep died due to unseasonal rain and thunderstorm scm 61 css