बुलढाणा: जिल्ह्यातील टूनकी (तालुका संग्रामपूर) या गावात लग्नाच्या वरातीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन गट एकमेकांना भिडले. यात तिघेजण जखमी झाले असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार गावातील लग्नाच्या वरातीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजविण्यात आले. प्रकरणी दोन गटात राडा होऊन तीन जण जखमी झाले आहेत. यावेळी दगडफेक करण्यात आल्याने डीजेच्या वाहनाचे नुकसान झाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ३६ दिवस जागते रहो…! शासकीय गोदामात ‘ईव्हीएम’ कडेकोट बंदोबस्तात राहणार

संग्रामपूर व सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटाची समजूत घालून कडक बंदोबस्त तैनात केला. चौघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. टूणकी या गावाला कडक बंदोबस्तमुळे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. दोन्ही गटाविरुद्ध सोनाला पोलीस ठाण्यात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येईल असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana at tunki village fight between two groups due to offensive song during marriage 3 injured scm 61 css