बुलढाणा : वन्यजीव सप्ताहानिमित्त ‘मी लोणारकर’ चमू व वन्यजीव विभाग मेळघाट यांच्या संयुक्त विद्यमाने लोणार अभयारण्याभोवती सायकल परिक्रमा काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी २८० सायकल स्वारांनी लोणार सरोवर परिक्रमा पूर्ण केली. वन्यजीव सप्ताह निमित्त विद्यार्थ्यांसाठी सायकल रॅली ,चित्रकला व निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम ,द्वितीय, आणि तृतीय आलेले शुभांगी विष्णू बाजड, पलक राजेश आढाव, प्राची प्रवीण जायभाये, श्रुती गजानन बगाडे, पूजा ज्ञानेश्वर शिंगणे, सायली शंकर राठोड व रुपेश विजय कोचर या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
हेही वाचा : दांडियाच्या सरावात रमली तरुणाई, विविध नृत्य प्रशिक्षकांकडून घेत आहेत रास गरबाचे धडे
बक्षिस वितरण समारंभ सरदार वल्लभ भाई पटेल विद्यालयात पार पडला. विभागीय अधिकारी वन्यजीव विभाग अकोला निमजे , पोलिस निरिक्षक निमेश मेहेत्रे सहाय्यक पोलिस निरिक्षक घोगरे , प्रकाश सावळे, वनपरिक्षेत्र अधिकारी
राठोड , प्राचार्य दत्तात्रय कुलकर्णी, मुख्याध्यापक रामेश्वर डोळे उपस्थित होते, आयोजनासाठी सर्पमित्र विनय कुलकर्णी, बंटी नरवाडे, विलास खरात, मी लोणारकरचे सचिन कापुरे, संतोष जाधव, विजय गोरे, समीर शहा, गोपाल सरकटे, रवींद्र तायडे, प्रकाश सानप, भूषण सानप, रोहन सोसे, सुशील सोसे, उमेद चिपडे, सचिन मस्के, शैलेश सदार, अमोल सरकटे, ज्ञानेश्वर कचरे, विनोद थोरवे व ‘वन्यजीव ‘चे सुरेश माने, सुनिता मोरे, ज्ञानेश्वर शिंदे, सदाशिव वाघ,गजानन शिंदे, निरंजन पोले यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंडळ अधिकारी संतोष जाधव यांनी तर बक्षीस वितरण कविता आघाव यांनी केले. आभार प्रदर्शन सचिन कापुरे यांनी केले.