बुलढाणा : समृद्धी महामार्गावर डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर भरधाव चारचाकी वाहनाचे टायर फुटून झालेल्या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये नागपूर येथील चौघांचा समावेश आहे. चॅनल क्रमांक २७४ वर ‘स्विफ्ट कार’ चे टायर फुटून ५ जण जखमी झाले. आज गुरुवारी दुपारी ही दुर्घटना घडली.

हेही वाचा : ‘पालकमंत्री फडणवीस परत या…. झेपत नसेल तर राजीनामा द्या’, गडचिरोलीत काँग्रेसचे ‘डफडे बजाव’ आंदोलन

डोणगाव पोलीस ठाणे हद्दीत शहापूर परीसरात अपघात झाला . यामध्ये पाच जण जखमी झाले. यामध्ये नागपूर येथील सुवर्णा चंद्रशेखर शेलोरे ( २८) चंद्रशेखर गजानन शेलोरे (३०) कुणाल अरुण ठाकरे शिवांश चंद्रशेखर शेलोरे (वय अडीच वर्ष ) व भुपेंद्र युवराज पटेले (राहणार पुणी, बालाघाट मध्यप्रदेश) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच ठाणेदार अमरनाथ नागरे व सहकाऱ्यांनी यांनी घटनास्थळ गाठून जखमीना प्रारंभी मेहकर व नंतर व त्यानंतर नागपुर येथे पुढील उपचारासाठी पाठविले.

Story img Loader