बुलढाणा : काँग्रेसचे बँक खाते गोठविणे व कोट्यवधींचा दंड ठोठावण्याचा विरोधात आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे काँग्रेससह आघाडीत खळबळ उडाली आहे. बुलढाणा शहर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा… धक्कादायक! नागपूरात नऊ महिन्यांपासून अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण

हेही वाचा… Maharashtra News Live : “रोज नवे जोक, देशात जॉनी लिव्हरनंतर…”, मेरठच्या सभेतील मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून राऊतांचा टोला

काँग्रेस पक्षाचे बँक खाते गोठवून त्यामधील रक्कम वळती करण्यात आली . सोबतच काँग्रेस पक्षाला १८०० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला. याचा निषेध करण्यासाठी काल रविवारी ३१ मार्चला बुलढाण्यातील जयस्तंभ चौकात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या नेतृत्वात घोषणाबाजी व निदर्शने करण्यात आली होती. बुलढाणा शहर पोलिसांनी याची दखल घेत कारवाई केली. निवडणूक आचारसंहिता काळात जमाव जमवून आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्यासह ११ जणांवर कलम १८८ व १३५नुसार गुन्हे दाखल केले आहे. यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana case registered against 11 congress party workers along with president rahul bondre for violation of code of conduct scm 61 asj