बुलढाणा : अपराध करणारी व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याला कठोर शिक्षा करणाऱ्या राजमाता जिजाऊंचे माहेर शिवबांचे आजोळ असलेला बुलढाणा जिल्हा आज पुन्हा हादरला! चिखली पाठोपाठ शेगावातही एका बालकाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. यामुळे शेगाव तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्ह्यातील समाज मन सुन्न झाले आहे. चिखली तालुक्यातील एका दहावर्षीय बालकाचे अपहरण करून आल्यावर त्याची हत्या करण्यात आल्याचे मंगळवारी उघडकीस आले होते. आज गुरुवारी, २५ जुलै रोजी या भीषण घटनेची शेगावात पुनरावृत्ती झाली. क्रिष्णा राजेश्वर कऱ्हाळे( वय १४, राहणार नागझरी, तालुका शेगाव, जिल्हा बुलढाणा) असे हत्या करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागझरी येथील १४ वर्षीय क्रिष्णाचे २३ जुलै २०२४ रोजी अपहरण झाले होते. खासगी शिकवणी वर्ग आणि शाळेत गेलेला क्रिष्णा घरी परतलाच नाही. घरच्यांनी त्यांच्या स्तरावर विचारपूस करून शोध घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र त्याचा पत्ता न लागल्याने शेगाव शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदविण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेतली.

हेही वाचा : दानशूर मिळेल का दानशूर… विद्यार्थ्‍यांच्‍या स्‍नेहभोजनासाठी शिक्षकांकडून शोध सुरू

शेगाव पोलिसांनी प्रकरणी

अज्ञात आरोपीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. प्राथमिक तपासा दरम्यान आज गुरुवारी (ता. २५) क्रिष्णा राजेश्वर कऱ्हाळे याचा मृतदेहच भास्तन येथील जंगलात आढळून आला. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे कऱ्हाळे परिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक आणि नागझरी येथील गावकरी हादरले आहे.

सीसीटीव्ही फुटेज

घटनेचा जलद गतीने तपास करणाऱ्या शेगाव पोलिसांच्या हाती महत्वाचा दुवा (पुरावा) लागला आहे. २३ जुलै रोजी सकाळी ७ वाजून ५० मिनिटांनी क्रिष्णाला एक संशयित इसम मोटारसायकल वरून घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना प्राप्त झाले. त्यावरून पोलिसांनी त्या संशयीताला ताब्यात घेऊन चौकशी केली. आधी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या व्यक्तीची पोलिसांनी ‘कडक भाषेत’ विचारपूस केल्यावर त्याने खरे ते सांगितले. त्यानंतर या खुनाचा उलगडा झाला. शेगाव पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच दोन आरोपी ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा : “आमदार महोदय, हे गढूळ पाणी पिऊनच दाखवा,” कार्यकर्ता संतापला; म्हणाला, “…तर लोकं जोडे मारतात,”

अरहान नंतर क्रिष्णा…

चिखली तालुक्यातील अंबाशी या गावातही असाच प्रकार घडला. मोहम्मद अरहान ( वय १०) याचे अपहरण करण्यात येऊन त्याची हत्या करण्यात आली. अपहरण करण्यात आलेल्या अरहानची अगोदर गळा दाबून निर्घृण हत्या करण्यात आली. नंतर त्याचा मृतदेह पोत्यात टाकून उकिरड्यात पुरण्यात आले. यावर कळस म्हणजे मृत बालकाच्या सख्ख्या आते भावानेच हत्याकांड केल्याचे निष्पन्न झाले. या घटनेने जिल्ह्यात उडालेली खळबळ शमत नाही तोच शेगाव तालुक्यातील घटनेने संत नगरी शेगाव सह जिल्हा हादरला आहे.