बुलढाणा : जिल्हा मुख्यालय असलेल्या बुलढाणा शहरातील वाढत्या गुन्हेगारीला आळा बसविण्यासाठी लवकरच महत्वाच्या ठिकाणी ९९ ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ लावण्यात येणार आहेत. रविवारी या यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. बुलढाण्यातील २६ महत्वाच्या ठिकाणी हे कॅमेरे लावण्यात येणार आहे.
यामध्ये आठवडी बाजार, कारंजा चौक, भोंडे सरकार, गर्दे वाचनालय, त्रिशरण, एडेड शाळा चौक, सोसायटी पेट्रोल पंप, संगम चौक, चावडी, राजमाता, जयस्वाल, इकबाल चौक, टिपू सुलतान चौक, टीबी रुग्णालय, धाड नाका या ठिकाणांचा समावेश आहे. पोलीस बळकटीकरणा अंतर्गत ही योजना कार्यान्वित करण्यात आली.
हेही वाचा : नागपूर : प्रेमाचा त्रिकोण! विधवेशी प्रेमसंबंधाच्या संशयावरून युवकाचा खून
जयस्तंभ चौकात एक कॅमेरा लावून शुभारंभ करण्यात आला. आमदार संजय गायकवाड यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. यावेळी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे शाखेचे अशोक लांडे, ठाणेदार प्रल्हाद काटकर हजर होते.