बुलढाणा : अपघातांच्या मालिकेने गाजणाऱ्या हिंदुहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपराध घटनेत आता गोवंश तस्करी आणि वाहतुकीची देखील भर पडल्याचे दुर्देवी चित्र आहे. शनिवारी ( दिनांक तेरा) मध्यरात्री नंतर घडलेल्या घटनेमुळे ही बाब निदर्शनास आली. शनिवार, १३ जुलैच्या मध्यरात्री ही घटना समृद्धी महामार्गावरील (मेहकर नजीक) बाबुळखेड फाट्यावर घडली. घटनेत राजस्थान राज्यातील तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले असून एक कंटेनर जप्त करण्यात आला आहे. चाळीस गोवंश जनावरांना अंतरी देशमुख येथील कन्हेय्या गोरक्षण मध्ये ठेवण्यात आले आहे.

एका कंटेनर मधून गोवंशची वाहतूक होत असल्याचे हिंदू राष्ट्रसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कळाले. राजस्थानमधील कंटेनर (आर जे १४ जीआर १४५५ ) समृद्धी महामार्गावरील मेहकर येथून जवळ असलेल्या बाबुळखेड फाट्यावर दिसून आला आहे. यामध्ये गोवंश जनावरे कोंबून, क्रूरपणे वाहतूक होत असल्याची माहिती मेहकर येथील रहिवासी मोनू अवस्थी यांनी हिंदूराष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय पवार यांना दिली. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांनी पवार यांना फोनद्वारे हे सांगितले. अवस्थी यांनी पवारांना अग्रवाल पेट्रोल पंपाजवळ येण्याचे सांगितले. त्याठिकाणी पोहोचले असता, अवस्थी यांच्यासह इतर काही कार्यकर्ते उपस्थित होते.

What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Uddhav Thackeray and rahul gandhi
इंडिया आघाडीत बिघाडी? विसंवादावरून ठाकरे गटाची काँग्रेसवर तोफ; म्हणाले, “हेवेदावे, जळमटे अन् कुरघोड्यांना…”
Image Of MVA Leaders
MVA : “महाविकास आघाडी उद्ध्वस्त होतेय, जनतेने त्यांना हाकलून दिले”, ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा; अजित पवार गटाचा टोला
Supriya Sule
Supriya Sule : महापालिका निवडणुकीबाबतच्या ठाकरे गटाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळेंचं रोखठोक मत; म्हणाल्या, “या निवडणुका…”
Vijay Wadettiwar On Thackeray group
Vijay Wadettiwar : “आम्ही उद्धव ठाकरेंना विनंती करू, अन्यथा…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान
Uddhav thackeray and Prakash Ambedkar
ठाकरेंच्या शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्यानंतर प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; म्हणाले, “आदित्य ठाकरेंच्या…”
Varsha Gaikwad
Varsha Gaikwad : “आम्हीही मुंबईपासून नागपूरपर्यंत…”, ठाकरे गटाच्या स्वबळाच्या घोषणेवर वर्षा गायकवाड यांची सूचक प्रतिक्रिया

हेही वाचा : ‘एमपीएससी’चे दुर्लक्ष; टंकलेखन परीक्षार्थींचे भविष्य अंधारात, ‘किबोर्ड’च्या…

दरम्यान, राजस्थानच्या कंटेनरमध्ये गोवंशाची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. यामुळे हिंदुराष्ट्र सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ते कंटेनर अडविले. गाडीमध्ये काय आहे? असे कंटेनर चालकाला विचारण्यात आले असता बैल घेवून चालल्याचे त्याने सांगितले. मात्र, संशय आल्याने हिंदूराष्ट्र सेनेचे विजय पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी कंटेनर उघडून बघितला. वाहनात ४ गायी व ३६ गोऱ्हे असल्याचे दिसून आले. आखूड दोऱ्याने बांधून आणि कोंबून अतिशय क्रूरपणे या जनावरांची वाहतूक होत असल्याचे समजले. गुरांसाठी चारापाणी देखील ठेवण्यात आला नसल्याचे दिसून आले.

विजय पवार यांनी मेहकर पोलिसांना याची माहिती दिली. त्यांनतर मेहकर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. कंटेनर, कंटेनर चालक व इतर दोघांना मेहकर येथील पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तिघां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मोहम्मद हुसेन यासीन खान ३० वर्षे, आसाराम बिल (दोघे राहणार सावरिया तालुका, तोडारायसिंग, जिल्हा टोक ,राजस्थान) आणि हमीद जीवा खान (४० वर्ष, राहणार इस्लामपूर,तालुका मालपुरा, जिल्हा टोकराजस्थान ) अशी आरोपींची नावे आहेत.

हेही वाचा : चंद्रपूर : अंत्ययात्रेला हजारो फटाक्यांची आतिशबाजी, पन्नास वाहने…गोंडपिंपरी तालुक्यात भावंडांकडून वडिलांना आगळा वेगळा निरोप

मेहकर पोलिसांनी तिघा आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम तीन (पाच), प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० च्या कलम अकरा (एक) (ड), महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम १९७६ च्या कलम पाच( प) , मोटार वाहन अधिनियम १९८८ च्या कलम ६६, मोटार वाहन चालन नियम १९८९ च्या कलम १२५ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा : अमरावती: शहर बसने चिमुकल्याला चिरडले, संतप्त जमावाकडून तोडफोड…

गुन्हेगारीचीही ‘समृद्धी’?

या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील अपराधांच्या घटनांत गोवंश तस्करी आणि वाहतुकीची सुद्धा भर पडली आहे. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महामार्गाचे लोकार्पण झाले आहे. प्रारंभीपासून वाहन अपघातांनी गाजणाऱ्या या मार्गावर लहानमोठ्या अनेक अपघातांची नोंद झाली. एकाच वेळी पंचवीस प्रवाश्यांचे बळी घेणारा अपघात सर्वात भीषण ठरला. यानंतर महामार्गावर अवैध डिझेल वाहतूक, जबरी चोरी, दरोडा, आदी घटनांची नोंद झाली. आता या महामार्गाचा गोवंश तस्करीसाठी देखील गैरवापर होत असल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे अपराधिक घटनांच्या दृष्टीने देखील हा मार्ग ‘समृद्ध’ झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Story img Loader