बुलढाणा : मालवाहू वाहनाद्वारे दीड क्विंटल मांस घेवून जाणाऱ्या सिल्लोड (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील दोघांवर शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंठा मार्गावरील कोलवड शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. एमएच २० ईएल ६५१९ क्रमांकाच्या या वाहनात गोवांशीय मास असल्याचा संशय काही नागरिकांनी बोलून दाखविला.
हेही वाचा : वर्धा : चार नराधमांचा मुलीवर बलात्कार, आरोपी फरार
त्यामुळे मांसाचे नमुने पशुवैद्यकीय विभागाकडे देण्यात आले. तपासणीत सदर मास गोवंशीय असल्याचे स्पष्ट झाले. वाहन चालक शेख गुलाब अहमद अब्दुल रहीम शेख (३२ वर्ष) व सोबतचा शेख आवेश शेख वाहेद (३४ वर्ष) दोन्ही राहणार सिल्लोड यांच्याविरुद्ध प्राणी संरक्षण अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.