सिंदखेड राजा : येथे राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त राजमातेच्या टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले. हा क्षण लाखो जिल्हावासी व जिजाऊ- शिवप्रेमींसाठी ऐतिहासिक व अविस्मरणीय ठरला. राजमाता जिजाऊंच्या ४२५ व्या जयंतीदिनी सिंदखेडराजा पंचायत समितीच्या सभागृहात हा सोहळा पार पडला. याप्रसंगी पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार राजेंद्र शिंगणे, संजय कुटे, आकाश फुंडकर, श्वेता महाले, जिल्हाधिकारी किरण पाटील, पोस्ट मास्तर जनरल अदनान अहेमद यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी शाहीर रामदास कुरंगळ यांनी पोवाडा सादर केला. तत्पूर्वी ना. मुनगंटीवार यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळी जाऊन अभिवादन केले.

हेही वाचा : चंद्रपुरात ब्राऊन शुगरची विक्री, पोलिसांनी सापळा रचून…

कर्तबगार लेकींचा सन्मान

राजमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पळसखेड सपकाळ येथील सेवा संकल्प प्रतिष्ठानच्या आरती नंदकुमार पालवे, यशस्वी उद्योजिका कविता अरुण गारोळे, २ एकर शेतीवर बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित उत्पादने कर्नाटकपर्यंत पोहोचविणाऱ्या उद्योजिका वंदना टेकाळे यांच्यासह अन्य महिलांचा समावेश आहे. आमदार संजय गायकवाड यांच्या पुढाकाराने जयस्तंभ चौकात साकारण्यात येणाऱ्या जिजाऊ माँसाहेब स्मारकस्थळी हा सन्मान सोहळा आज पार पडला.

Story img Loader