बुलढाणा : समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी झाले. आज गुरुवारी नागपूर कॉरिडोर चॅनेल नबर ३१३.२ वर दुसरबीडनजीक (ता. सिंदखेडराजा) ही दुर्घटना घडली. एम एच ०४ केएफ ८७४० क्रमांकाच्या आयशर ट्रकचे चालक रणजीत गौतम (४० रा सुलतानपूर, उत्तर प्रदेश) हे आपले वाहन ट्रकच्या लेनवर चालवित होते. जेट विमानाला लागणारे तेल (ऑईल) घेऊन ते जात होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

दरम्यान, मागेहून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्रमांक एम एच ४८ सी क्यू ४८२८) त्यांच्या ट्रकला धडक दिली. यात चालक रणजीत गौतम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, वाहनात बसलेले संतोष छोटूलाल हरिजन (२५, रा.मुंबई-उरण) महिंद्र गौतम (५०), सोनू गौतम (३०) हे जखमी झाले.

हेही वाचा…“संविधानात बदल हा काँग्रेसचा अपप्रचार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका; म्हणाले…

अपघातग्रस्त आयशरचा अक्षरशः चुराडा झाला. दोन्ही वाहने महामार्गाच्या मधोमध असल्याने काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती. महामार्ग पोलीस विभागाचे उपनिरीक्षक गजानन उज्जैनकर, पोलीस हवालदार विठ्ठल काळुसे, निवृत्ती सानप व महाराष्ट्र सुरक्षा दलाचे अमोल जाधव, उमेश नागरे, जयकुमार राठोड यांनी वाहतूक थांबवून जखमींना वाहनाबाहेर काढले. जखमींना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.