बुलढाणा: अनेक दिवसांच्या उसंतीनंतर मलकापूर तालुक्यात मुसळधार पावसाने वादळी वाऱ्यासह सर्वदूर हजेरी लावली. यामुळे लाखावर शेतकरी सुखावले असतानाच विजेच्या तांडवाने देखील थैमान घातले.वीज अंगावर कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य एक महिला गंभीर जखमी झाली.तसेच वीज पडून एका बैल दगावला आहे.

आज रविवारी १८ ऑगस्ट रोजी मलकापूर तालुक्यात मुसळधार पावसाने सर्व दूर दमदार हजेरी लावली. मलकापूर शहर परिसर आणि तालुक्यातील अनेक गावांत पाऊण ते एक तास धुवांधार पाऊस बरसला. तालुक्यातील म्हैसवाडी, विवरा गाव आणि शेत शिवारात पावसाचा आवेग जास्त होता . पुष्पा प्रभाकर राणे (वय ५६ वर्ष, राहणार म्हैस वाडी, तालुका मलकापूर) यांचे म्हैसवाडी शिवारात शेत आहे. त्या आणि म्हैसवाडी गावातीलच योगिता विनोद किनगे (वय ४५ वर्ष) या दोघी शेतात काम करीत होत्या. यावेळी वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. पाऊण ते एक तास मुसळधार पाऊस बरसला. दरम्यान अचानक वीजेचा लोळ अंगावर कोसळून पुष्पा राणे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या सोबतच्या सहकारी महिला योगिता किनगे या सुदैवाने बचावल्या असल्या तरी गंभीर रित्या जखमी झाल्या आहे. विजेचे हे तांडव शेजारीच शेत असलेल्या चेतन पाटील यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने म्हैसवाडी चे पोलीस पाटील योगेश पाटील यांना भ्रमणध्वनी वरून या दुर्दैवी घटने संदर्भात माहिती दिली. योगेश पाटील यांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेत तहसीलदार राहुल तायडे, मंडळ अधिकारी वानखेडे, तलाठी कौशल महाजन व दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांना भ्रमणध्वनी वरून सदर घटनेची माहिती दिली. केली.

Two youths attacked with a koyta in Khadki crime news Pune news
पुणे: खडकीत दोघा तरुणांवर कोयत्याने वार
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
23 year old woman drowned her one year old son in water tank in Washind area of ​​Bhiwandi
जन्मदात्या आईकडूनच मुलाची हत्या
fox death Mumbai, Third fox death, fox ,
मुंबई : रेबीजमुळे आणखी एका कोल्ह्याचा मृत्यू, तीन महिन्यांतील कोल्ह्याच्या मृत्यूची तिसरी घटना
Raghunath More, Raghunath More passed away,
शिवसेनेचे रघुनाथ मोरे यांचे निधन, दिघे यांच्या निधनानंतर साभांळली होती ठाणे जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
60 year old woman injured in stray dog attack near Titwala complex
टिटवाळ्यात भटक्या श्वानांच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…

हेही वाचा : ठाकरे गटाचा आणखी एक आमदार ‘एसीबी’च्या रडारवर! पाल्यांच्या शैक्षणिक खर्चाची…

वेळीच मिळाली मदत

योगा योगाने याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते शुभम लाहुळकर हे नजीकच्या रस्त्याने जात होते. त्यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी जखमी योगिता किनगे यांना स्वतःच्या चार चाकी वाहनाने मलकापूर आणत तातडीने खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती केले. त्यामुळे गंभीर जखमी योगिता किणगे यांच्यावर लवकर उपचार करणे शक्य झाले. दुसरीकडे मलकापूर नगरपरिषद चे माजी नगराध्यक्ष अॅडव्होकेट हरीश रावळ यांनी घटनेची माहिती मिळताच मलकापूरहून रुग्णवाहिका पाठवीली. त्या वाहनातून पुष्पा राणे यांचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला.

बैल ठार

दरम्यान म्हैस वाडी प्रमाणेच दसरखेड औद्योगिक वसाहत परिसरातील विवरा येथे पाऊस आणि विजेने आज शुक्रवारी थैमान घातले.यामुळे नीलिमा प्रकाश चोपडे यांच्या शेतात असलेल्या बैलावर वीज कोसळून तो जागीच दगावला. विवरा येथील पोलीस पाटील यांनी दसरखेड एमआयडीसी पोलीस ठाण्याला याची माहिती दिली.

हेही वाचा : विधानसभा निवडणूक : भाजपसोबत असणारा तेली समाज उमेदवार पाडण्याचा इशारा का देतो आहे?

सर्वाधिक पाऊस

दरम्यान जिल्ह्यात आज अखेर मलकापूर तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तालुक्याचे वार्षिक पर्जन्यमान ७०५. ५ मिलिमीटर आहे. त्या तुलनेत तालुक्यात आज १८ ऑगस्ट अखेर ५३२ मिलिमीटर पावसाने हजेरी लावली आहे. याची टक्केवारी ७५.३१ इतकी आहे. पिकपाण्याची स्थिती चांगली असल्याने लाखावर शेतकरी सुखावले आहे.

Story img Loader