बुलढाणा : पत्नीला तलाक देण्यासाठी कागदपत्रे घेऊन बोलविले, अन राजूर घाटात जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र यावेळी पोलीस चौकीतील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे तिचे प्राण वाचले. ही थरारक घटना बुलढाणा मलकापूर राज्य मार्गावरील राजूर घाटात घडली. या प्रकरणी काल रात्री उशिरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून क्रूर पतीस अटक केली. फिर्यादी पत्नीने दिलेल्या तक्रारीनुसार तिचा पती आरोपी शेख इब्राहिम शेख चांद याने पत्नीस तलाक देण्याचे ठरविले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : बापरे… ‘त्या’ बिबट्याने थेट वनखात्याच्या वाहनावर झेप घेतली, नशीब बलवत्तर म्हणून…

कागदपत्र आणायचे सांगून पत्नीला बुलढाण्याच्या राजूर घाटात आणले. त्यांनतर अचानक ओढणीने गळा आवळला असता पत्नीने जिवाच्या आकांताने आरडाओरड केली. यावेळी देवी मंदिराजवळ असलेल्या पोलीस चौकीतील ‘होमगार्ड’ सोमनाथ वानरे, शुभम शेळके यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी इब्राहिमला ताब्यात घेतल्याने पत्नीचा जीव वाचला. आरोपीविरुद्ध भादवीच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला . त्याला अटक करण्यात आली आहे.