बुलढाणा : सैलानी बाबांच्या दर्शनासाठी आलेल्या वाशीम जिल्ह्यातील दाम्पत्याच्या दुचाकीला टिप्पर(मिक्सर)ने धडक दिली. यामध्ये पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाली. आज शुक्रवारी दुपारी ही दुर्घटना घडली. संजय कुकाजी हाडे असे मृतक पतीचे तर रंजना हाडे असे जखमी महिलेचे नाव आहे. गोहेगाव ( तालुका रिसोड, जिल्हा वाशीम) येथील हे दाम्पत्य आपल्या दुचाकीने सैलानी दरगाह येथे दर्शनासाठी आले होते.
हेही वाचा : अकोला: नितीन गडकरींमुळेच मी कृषीमंत्री; धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने भुवया उंचावल्या
दर्शन करून परतत असताना सैलानी ते पिंपळगाव सराई दरम्यान हनुमान टेकडीजवळ त्यांच्या वाहनाला टिप्पर (मिक्सर)ने धडक दिली. यात संजय हाडे ठार झाले तर पत्नी रंजना गंभीर जखमी झाली. रंजना हाडे यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे. रायपूर ठाणेदार राजपूत यांनी जखमी महिलेची भेट घेऊन सांत्वन केले.