बुलढाणा : अटकेची कारवाई टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या किनगाव राजा (तालुका सिंदखेड राजा) पोलीस ठाण्याच्या हवालदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार अरुण गणपत मोहिते (५२ वर्ष) यांना रोख २० हजार रुपयांची लाच मागणे भोवले असून लाच प्रतिबंधक विभागाकडून त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार आणि त्यांच्या कुटुंबांविरुद्ध किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत कलम ३५४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : “जालनाच्या घटनेमागे कोण हे लवकरच समोर येईल,” मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचे विधान; म्हणाले…

दरम्यान तक्रारदार आणि कुटुंबीयांना अटक होऊ नये याकरिता आरोपी मोहिते याने सुरुवातीला वीस हजार रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर दहा हजार रुपयांची मागणी केली होती. तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगळे यांनी केला. उपअधीक्षक शीतल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी राजेश क्षीरसागर, प्रवीण बैरागी विनोद लोखंडे, जगदीश पवार , चालक शेटे, शेख, शैलेश सोनवणे, स्वाती वाणी यांनी कारवाईत सहकार्य केले.