बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यात आज सोमवारी, २ डिसेंबर रोजी ढगाळ वातावरण असून तुरळक पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मात्र चिखली तालुक्यातील अंचरवाडी येथे पाऊस तर पडला नाही, पण भलतीच वस्तू पडल्याने गाव परिसरासह चिखली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. अंचरवाडी येथे आकाशातून एक संयंत्र वजा उपकरण पडले आहे. एका मोठ्या फुग्याला बांधलेले हे संयंत्र (उपकरण) आहे. अंचरवाडी येथील शेतकरी गावातील संजय सिताराम परिहार यांच्या शेतात हे यंत्र पडले आहे. आज सोमवारी २ डिसेंबर रोजी, सकाळी संजय परिहार यांचा मुलगा अविनाश परिहार आणि चुलत भाऊ वैभव परिहार हे नित्यनेमानुसार कामानिमित्त शेतात गेले होते. यावेळी त्यांना दूरवरून शेतात काही तरी वेगळंच पडलेले दिसून आले.

दोघांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांना मोठ्या फुग्याला (बलूनला) जोडलेले हे यंत्र दिसून आले. अविनाश , वैभव यांनी याची माहिती देताच गावकरी, नातेवाईक यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच ही माहिती काही प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना दिली. दरम्यान पोलीस आणि महसूल चे कर्मचारी दाखल झाले. हे उपकरण हवामान खात्याने सोडले असावे असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला . मात्र त्या उपकरणवर कोरियन भाषेत मजकूर असल्याने गूढ वाढले. दरम्यान, उपकरण कशाचे आहे? याबद्दल दुपारी बारा वाजेपर्यंत माहिती मिळू शकली नाही. मात्र यंत्रावर कोरियन भाषेतील मजकूर असून या यंत्रांची निर्मिती कोरिया मध्ये झाल्याचा उल्लेख आहे.

raining in Akola district during the winter season
अकोला: ऐन हिवाळ्यात पावसाचा तडाखा; वातावरणातील बदलाने…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Entry to Vasota Fort banned for three days Forest Department decision satara
वासोटा किल्ला प्रवेशावर तीन दिवस बंदी; वनविभागाचा निर्णय
amravati rain news
अमरावती : थंडीची लाट…! विभागीय आयुक्तांनी काय दिला इशारा?
Borivali air, Air pollution Mumbai, Air pollution Borivali,
बोरिवलीची हवा ‘अतिवाईट’, मुंबईत हवा प्रदूषणाचे सत्र सुरूच
Thane district water, MIDC, MIDC water scheme ,
ठाणे जिल्ह्याचे पाणी महागणार ? एमआयडीसीची पाणी योजना तोट्यात, दर वाढवण्याच्या हालचाली
experienced cold temperatures for past few days cold will remain in Mumbai till end of month
मुंबईत महिनाअखेरीपर्यंत गारठा कायम राहणार
Will water supply in Wardha remain shut indefinitely
वर्ध्यात पाण्यासाठी हाहा:कार! पाणीपुरवठा बेमुदत बंद राहणार ?

हेही वाचा : शिवशाही अपघात : आदल्या दिवशी बस चुकली अन्…

हवामान खाते म्हणते…

दरम्यान यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांना विचारणा केली असता त्यांनी असे उपकरण पडल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.आपण निवासी उप जिल्हाधिकारी यांना याची कल्पना दिली असल्याचे सांगितले. तसेच प्रादेशिक हवामान विभागाचे नागपूर केंद्राच्या अधिकाऱ्यासोबत चर्चा केल्याचे सांगितले. हे हवामान विषयक उपकरण असून आमच्या संगणक प्रणाली सोबत जोडलेले आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे प्रादेशिक हवामान खात्याच्या नागपूर केंद्राने स्पष्ट केल्याचे संभाजी पवार म्हणाले.

Story img Loader