बुलढाणा : सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीसाठी राज्यव्यापी आंदोलन करणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या एल्गार रथयात्रा वा मोर्चात कुठेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा फलक वा राजू शेट्टी यांचा नामोल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तुपकरांनी स्वाभिमानी संघटनेशी फारकत घेतली का? हा प्रश्न ऐरणीवर आला. या प्रश्नाचे उत्तर आता स्वतः रविकांत तुपकर यांनीच दिले असून काही पूरक खुलासेही त्यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आज प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना त्यांनी ‘राजकीय फारकत’चा स्पष्ट शब्दात इन्कार केला. मी आजही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मात्र, राजदरबारी उपेक्षित असलेल्या विदर्भ, मराठवाड्यातील लाखो सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मजबूत ऐक्य-संघटन व्हावे, एक दवाब गट आणि ‘व्होट बँक’ असावी असा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे यंदाचे एल्गार आंदोलन राजकीय पक्ष वा संघटनाविरहित करण्यावर आम्ही भर दिला. मागील वर्षीसुद्धा अशाच पद्धतीने पक्षविरहित आंदोलन केले व यशस्वीदेखील ठरल्याचे तुपकर यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : “पाऊले चालती शेगावची वाट…” ‘कार्तिकी’निमित्त संतनगरीत हजारो भक्तांची मांदियाळी; १५० दिंड्या दाखल

हेही वाचा : संघर्ष यात्रेच्या समारोपासाठी शरद पवार १२ डिसेंबरला नागपुरात, विधानभवनावर धडकणार यात्रा

शेतकरी विविध राजकीय पक्षात आणि जाती-धर्मात विभागल्या गेला आहे. यामुळे आम्ही अराजकीय प्रबळ आंदोलन उभारण्याचा प्रयत्न करीत आहोत. मागील तीनेक वर्षांतील प्रयत्नामुळे ही धडपड यशस्वी ठरली. पश्चिम महाराष्ट्रात ऊस व दुध उत्पादक शेतकरी पक्ष सोडून एकत्रित आंदोलन करतात, आपल्या मागण्या मान्य करून घेतात. त्याच धर्तीवर आम्ही आंदोलन करीत आहोत. यंदाच्या बुलढाण्यातील मोर्चात विदर्भासह मराठवाडातील शेतकरी नेते व कार्यकर्ते यांचा मोठा सहभाग होता. यामुळे स्वाभिमानीशी फारकत, बुलढाणा लोकसभा मतदार संघातून मी निवडणूक लढणार का, हे प्रश्न गैरलागू आहेत. आता २९ नोव्हेंबरचे मंत्रालयाचा ताबा घेण्याचे आंदोलनदेखील याच पद्धतीने करणार असल्याचे सांगून मी स्वाभिमानीतच असल्याचा पुनरुच्चार तुपकर यांनी या केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana leader ravikant tupkar on raju shetty and swabhimani shetkari sanghtana scm 61 css
Show comments