बुलढाणा : मागील दहा दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाकडे करण्यात येणाऱ्या दुर्लक्षामुळे आदिवासी कोळी महादेव समाज बांधव चांगलेच संतापले! त्यामुळे त्यांनी निष्क्रिय शासन व प्रशासनाचा दशक्रिया विधी केला. मुंडन करणारे पदाधिकारी आणि रडारड करणारे व बोंबा मारणारे कार्यकर्ते, महिला यांमुळे जिल्हा कचेरीसमोरील हे आंदोलन नागरिकांचेही लक्ष वेधणारे ठरले. हे आंदोलन बघण्यासाठी अनेकांनी रस्त्यावरच वाहने थांबविल्याने वाहतूक विस्कळीत झाली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : धक्कादायक! आंतरजातीय विवाह करणाऱ्या मुलीचे बापानेच केले अपहरण, कारमध्ये कोंबून…

जात प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी आदिवासी कोळी समाज बांधवांनी २ जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले. यादरम्यान नजीकच्या बीएसएनएल टॉवरवर चढून शासन प्रशासनाचे लक्ष वेधले. मात्र आंदोलनाकडे दुर्लक्ष कायम असल्याने आज गुरुवारी प्रतिकात्मक ‘दशक्रिया विधी’ करण्यात आला. गणेश इंगळे, गजानन धाडे, संदीप सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात येत आहे.