बुलढाणा : भाजपच्या विजयाचा देशभरात जल्लोष साजरा होत असताना मेहकर येथे भाजपच्या दोन गटात राडा झाला. विधानसभा प्रमुखासह तिघांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणी भाजपाच्या २३ पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याविरुद्ध मेहकर पोलिसांनी गंभीर स्वरूपाच्या कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. मेहकर विधानसभा प्रमुख प्रकाश गवई यांनी स्वतः तक्रार दिली आहे. यावरून मेहकर पोलिसांनी २३ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.
हेही वाचा : चंद्रपूर : शिवसेनेची पीकविमा कंपनीच्या कार्यालयात तोडफोड, कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
आरोपींमध्ये प्रल्हाद लष्कर, विलास लष्कर, प्रदीप इलग, चंद्रकांत अडेलकर, रोहित शेळके, शुभम खंदारकर, गोपाळ देशमुख, दीपक निकस, अक्षद दीक्षित, सीताराम ठोकळ, चेतन भांडेकर, महावीर मंजुळकर, गजू मंजुळकर, बलविर मंजुळकर, आकाश पिटकर, सुमित शिंदे, ओम पिटकर, जयकांत शिक्रे, रवी शिंदे, आकाश मोहिते, सोनू गुंजकर, शंकर गायकवाड यांचा समावेश आहे. काल रविवारी ( दि ३) दुपारी फिर्यादी गवई, नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन वानखडे हे भाजप संपर्क कार्यलयात पत्र परिषदेसाठी बसले होते. त्यावेळी वरील आरोपींनी कार्यालयात घुसून लोखंडी सळई, लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत साहित्यांची मोडतोड केल्याचे तक्रारीत नमूद आहे.