बुलढाणा : शासनातर्फे देण्यात येणारे अनुदान लवकरच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. यासंदर्भातील आदेश लवकरच निर्गमित होणार आहे. राज्य शासनातर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ५ रुपये असे अनुदान देण्यात येते. मात्र हे अनुदान शेतकऱ्यांना देण्याऐवजी दूध संघ किंवा संबधित ‘डेअरी’ला देण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. बुलढाण्यातील दूध उत्पादकांच्या शिष्टमंडळाने बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांची भेट घेऊन ही अडचण मांडली.
हेही वाचा : युवक-युवतीचे मृतदेह आढळल्याने गोंदिया जिल्ह्यात खळबळ; हत्या की आत्महत्या?
यावर आमदार गायकवाड यांनी थेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत चर्चा केली. त्यांनी दूध उत्पादकांच्या व्यथा मांडून अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली. यावर मंत्र्यानी ही मागणी तत्त्वतः मान्य केली. तसेच यासंदर्भातील आदेश लवकरच निर्गमित करण्याची ग्वाही देखील दिली.