बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील आमचा (शिवसेनेचा) उमेदवार इतका सक्षम होता की, त्यांना स्वबळावर मोठ्या मताधिक्याने निवडून यायचा आत्मविश्वास होता. त्यामुळे मीच काय त्यांनी दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा नाकारली, असा मार्मिक टोला बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव तथा केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आमदार संजय गायकवाड यांना लगावला आहे.
कालपरवा बुलढाणा शहरातील एका कार्यक्रमात बुलढाणा आमदार संजय गायकवाड (शिवसेना शिंदे गट) यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजप नेते जळगाव जामोदचे आमदार यांच्यावर टीकास्त्र सोडले. या दोघा नेत्यांनी निवडणुकीत आपले कामच केले नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. यावर प्रासिद्धी माध्यमांनी विचारणा केली असता जाधव यांनी मार्मिक टोला लगावला. बुलढाणा तालुक्यातील धाड येथील दंगलग्रस्त भागाची पाहणी नामदार जाधव यांनी केली. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा : शिवशाही अपघात : आदल्या दिवशी बस चुकली अन्…
जाधव म्हणाले, बुलढाणा विधानसभा मतदारसंघ आणि जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. त्यांना कोणी काय केले ते चांगल्या प्रकारे माहीत आहे. ते मी सांगायचं काम नाही. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क करून जयश्री शेळके यांना बुलढाणा मतदारसंघात ठाकरे गटाचे तिकीट मिळवून दिल्याचा आमदारांचा आरोप निरर्थक असल्याचे ते म्हणाले. कोणीही कोणताही आरोप करू शकतो, त्याला आपण काय करणार ? असा मिष्कील सवाल त्यांनी यावेळी केली. मी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सांगून बुलढाण्याची जागा काँगेस ऐवजी ठाकरे गटाला सोडवून घेतली, असा आरोपही कुणी करू शकतो. अशा आरोपात काहीच तथ्य नसल्याचे ते म्हणाले.
हेही वाचा : कोण आहे ‘मतदारांच्या मनातील आमदार’…साकोलीतील फलकाची जोरदार चर्चा
‘दंगलीचे प्रमाण वाढले, मुळाशी जाऊन तपास करा’
दरम्यान, धाड येथील दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्यावर केंद्रीय मंत्री यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांच्या समवेत चर्चा केली. जिल्ह्यात एकाच आठवड्यात दोनदा दंगल झाली. त्यामुळे दंगलीच्या मुळाशी जाऊन त्यासाठी जबाबदार असलेल्या विरुद्ध कडक कारवाई करा असे निर्देश त्यांनी दिले. मात्र, कारवाई करत असताना निर्दोष नागरिकांना यामध्ये गोवु नका. धाड परिसरातील सर्व ‘सीसीटीव्ही फुटेज’ तपासणी करून घटनेची माहिती जाणून घ्या अशी सूचनाही त्यांनी यावेळी दिली. स्थानिक पोलिसांचा वचक कमी झाल्याने वारंवार तणावाच्या घटना घडत असल्याचे, त्यासाठी प्रशासन देखील जबाबदार असल्याचे नागरिकांनी यावेळी सांगितले. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, निलेश गुजर, खडके उपस्थित होते .