बुलढाणा: मुंबई मधील घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासन खडबडून जागी झाल्याचे चित्र आहे. बुलढाणा जिल्ह्यातही जिल्हा प्रशासन व नगरपरिषदा सक्रिय झाले आहे. बुलढाणा शहरातील नियम धाब्यावर बसवुन लावण्यात आलेले महाकाय फलक काढण्याची मोहीम आजपासून हाती घेण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्रिशरण चौक, चिखली राज्यमार्गाला जोडणाऱ्या ‘सर्क्युलर’ मार्ग, तसेच जिजामाता महाविद्यालय परिसरातील मोठ्या आकाराचे फलक काढण्यास आज पासून प्रारंभ करण्यात आला आहे. बुलढाणा नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक गणेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण प्रतिबंध विभाग ही कारवाई करीत आहे.

हेही वाचा : पत्नीला बाळ होत नाही म्हणून दुसऱ्या महिलेला केले गरोदर…

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार बुलढाणा शहरातील अनधिकृत होर्डिंग फलक हटवण्यास सुरुवात झाली आहे. स्वतः मुख्याधिकारी गणेश पांडे यांच्या उपस्थितीमध्ये सर्क्युरल रोडवरील फलक काढण्यात आले. बहुतेक महाकाय फलक अवैध असल्याचे व कायदे, नियम धाब्यावर बसवून लावण्यात आल्याचे वृत्त आहे.

हेही वाचा : बुलढाणा : भरधाव वाहनाला ताकदवान रोहीची धडक, चालक जागीच ठार

मुंबई मधील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फलकांचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने निवासी उपजिल्हाधिकारी निर्भय जैन यांनीही जिल्ह्यातील १३ तहसीलदार, ११ नगरपालिका व दोन नगरपंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र दिले होते. त्यानुसार ही कार्यवाही हाती घेण्यात आली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana most of the hoardings at district headquarters are illegal scm 61 css