बुलढाणा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि रोहित पवार यांनी ते मराठा की ओबीसी, हे जनतेसमक्ष जाहीर करावे, असे आवाहन शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी केले आहे. नामदेव जाधव यांना काळे फासण्याच्या कृत्याचाही त्यांनी निषेध नोंदविला आहे. बुलढाण्यात निवडक प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी हे रोखठोक विधान करून नव्या वादाला तोंड फोडले. शरद पवार यांच्या जातीचे प्रमाणपत्र व्हायरल करणाऱ्या नामदेव जाधव यांना काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काळ फासले. या घटनेचा खासदार जाधव यांनी यावेळी जाहीर निषेध केला.

हेही वाचा : गडचिरोली : रानटी हत्तींचा हैदोस, भरपाईसाठी अटींचा अडथळा

Udayanraje Bhosale criticism of Sharad Pawar candidate
पाडा पाडा म्हणणाऱ्या पवारांचे उमेदवारच लोक पाडतील; उदयनराजे यांचे टीकास्त्र
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
MVA allegation is that money is being distributed to the police by BJP Pune news
भाजपकडून पाेलीस बंदाेबस्तात पैशांचे वाटप? ‘मविआ’चा आरोप, महायुतीचेही प्रत्युत्तर..
uddhav thackeray emotional appeal impact to voters
उद्धव यांचे भावनिक आवाहन ठाकरे सेनेला कितपत तारणार? मराठवाड्याकडे विशेष लक्ष?
I have responsibility of holding big post of state says Jayant Patil
राज्याचे मोठे पद सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर- जयंत पाटील
rebels in mahayuti gives relief to patolas sakoli assembly constituency
लक्षवेधी लढत : महायुतीतील बंडखोरीने पटोलेंना दिलासा
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी

शरद पवार यांचे व्हायरल केलेले जातीचे प्रमाणपत्र एका वेबसाईटवरून काढले, अशी माहिती खासदार जाधव यांनी दिली. ते प्रमाणपत्र चुकीचे किंवा खोटं असेल तर संबंधित वेबसाईटविरुद्ध पवारांनी कारवाई करायला पाहिजे. यामध्ये नामदेव जाधव यांचा काय दोष? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शरद पवारांचं एक प्रमाणपत्र ‘ओपन’ तर दुसरे ‘ओबीसी ‘ असेल तर त्यांनी, बनावट प्रमाणपत्र कोणते आणि मूळ कोणते याची माहिती माध्यमांसमोर येऊन द्यावी. शरद पवार यांनी ते मराठा आहेत की ओबीसी, हेही जनतेला सांगावे, असे खासदार जाघव म्हणाले.