बुलढाणा : ‘आयशर’ आणि कारची धडक होऊन झालेल्या अपघातात बुलढाणा येथील एकाचा मृत्यू झाला. तीघे जखमी झाले असून दोघा गंभीर जखमींना उपचारांसाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले तर एक किरकोळ जखमी झाला आहे. आज शनिवारी पहाटे साखर खेर्डा (सिंदखेडराजा) पोलीस ठाणे हद्दीत ही दुर्घटना घडली. स्टेट बँकेचे लॉकर घेऊन एमएच १८ बीजी ८२२५ या क्रमांकाचा आयशर ट्रक धुळे येथून हैदराबादला जात होता. याचवेळी औंढानागनाथ येथून दर्शन घेऊन बुलढाणा येथे होन्डा एमेझ (एमएच २८-बीके १७९५ ) ही कार जात होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : दहावीचा हिंदीचा पेपर फुटला? वर्ध्याच्या सेलू येथील प्रकार, शाळा व्यवस्थापन म्हणते…

ट्रक व कारची जोरात धडक झाली. यामुळे चारचाकीतील अत्यवस्थ वैभव रामकृष्ण लोखंडे यांचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे (सर्व रा सुंदरखेड तालुका बुलडाणा) हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना संभाजीनगर येथे उपचारांसाठी हलविण्यात आले. अविनाश पंजाब गव्हाने (रा सुंदरखेड )हा किरकोळ जखमी झाला आहे. हवालदार कडूबा डोईफोडे, जमादार लक्ष्मण ईनामे, राजेश गीते, मेहेर यांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्य केले. पोलीसांनी आयशर ट्रक चालकास ताब्यात घेतले आहे.