बुलढाणा : तीन दिवसांनंतर जाग आलेल्या प्रशासनाने अखेर धाड ग्रामपंचायतला भेट दिली. ग्रामपंचायतमध्ये बैठा सत्याग्रह करणाऱ्या सदस्य व नागरिकांशी दीर्घ चर्चा व कारवाईचे आश्वासन प्रशासनाने दिले. यानंतर बैठा सत्याग्रह मागे घेण्यात आला. बुलढाणा पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी व इतर अधिकाऱ्यांनी सत्याग्रह करणाऱ्या सदस्यांसोबत तब्बल तीन तास चर्चा केली. ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना पत्र देऊन अतिक्रमणाची बाब विषय सूचीवर घेऊन कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : केवळ विदर्भातच ६६ लाख बेरोजगार! वामनराव चटप म्हणाले, “यावर स्वतंत्र विदर्भ राज्य हाच एकमेव उपाय”

आंदोलकांनी ग्रामपंचायतीतील गैरप्रकाराची विस्तृत चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली. यावर २ नोव्हेंबरला चौकशी करून कारवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. मागील २७ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजतापासून अतिक्रमण व अन्य मागण्यांसाठी धाड ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच अभिमन्यू तायडे, सदस्य रिजवान सौदागर, प्रभाकर जाधव, मोहम्मद शफिक अब्दुल रफिक, मोहम्मद रईस अब्दुल खलील, मोहम्मद फहीम कुरेशी, ताहेर बागवान, माजी सभापती निसार चौधरी, शरद बावस्कर, सय्यद नसीर सय्यद गफार, राजू गायकवाड, माजी उपसरपंच दिलीप खांडवे, शंकर खांडवे, किसन थोरात, जयेंद्र थोरात यांनी बैठा सत्याग्रह पुकारला होता.