बुलढाणा : सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने ठोस आश्वासने दिली, मात्र मुदतीत अंमलबजावणी केली नाही. यामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकरांकडून पुन्हा एकदा आंदोलनाची घोषणा करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यातील या आंदोलनात १९ डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल करण्यात येणार आहे. राज्यातील सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे बुलढाणापाठोपाठ महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या सोमठाणा (ता.चिखली) येथे पार पडलेल्या बैठकीत तुपकरांनी ही घोषणा केली. दिलेला शब्द न पाळणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नागपूर अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करण्यात येत असल्याचे त्यांनी माध्यमांसोबत बोलताना सांगितले.

१८ डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावरील मेहकरजवळील फरदापूर टोल येथून शेतकरी नागपूरच्या दिशेने रवाना होतील. १९ डिसेंबर रोजी अधिवेशनावर हल्लाबोल आंदोलन करणार आहेत. सोयाबीन-कापूस उत्पादकांची ताकद व रोष काय असतो हे सरकारला १९ डिसेंबर रोजी नागपूरात दाखवू, असा इशारा यावेळी तुपकरांनी दिला.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
rbi digital awareness loksatta
जनजागृतीवर ५९ कोटींचा खर्च, तरीही सर्वसामान्यांच्या २,८८० कोटींवर डल्ला…बँकेत तुमचे पैसे…
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
pune municipal corporation create email address for complaints regarding water issues
समाविष्ट गावातील पाणीपुरवठ्याच्या तक्रारींसाठी पालिकेने घेतला हा निर्णय !

हेही वाचा : बुलढाणा: चोरट्यांचा मध्यरात्री धुडगूस, वाघजाळ गावात तिघांना मारहाण; लाखाचा ऐवज लुटला

शब्द दिला, अंमलबजावणीचे काय?

येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी १०० टक्के नुकसान भरपाई, सोयाबीन, कापसाला दरवाढ, पिकविम्याची पूर्ण रक्कम मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली गेल्या २ महिन्यांपासून सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे. एल्गार रथयात्रा, २० नोव्हेंबर रोजी बुलढाण्यात झालेला एल्गार महामोर्चा, रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन व मुंबईत मंत्रालय ताब्यात घेण्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी धडक दिली. राज्य सरकारने २९ नोव्हेंबर रोजी शेतकऱ्यांशी चर्चा केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहुतांश मागण्या मान्य केल्या.

हेही वाचा : बदलीसाठी महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी, अधिकाऱ्याविरोधात गुन्‍हा दाखल

सोयाबीन-कापूस दरवाढीसंदर्भात केंद्रीय वाणिज्यमंत्री पियूष गोयल यांच्यासोबत ९ डिसेंबर रोजी बैठक झाली. केंद्र सरकार सकारात्मक असल्याचे गोयलांनी सांगितले. मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांनी सरकारला १५ डिसेंबर पर्यंतची मुदत दिली होती. मुदत संपली पण सरकारने अंमलबजावणीला सुरवात न केल्याने, तुपकरांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.