बुलढाणा: शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांच्या आरोप प्रत्यारोपचा कलगीतुरा रंगला असताना शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या वादात उडी घेतली. आमदार गायकवाड यांनी नामदार जाधव यांच्याविरोधात केलेले आरोप गंभीर असून त्यात तथ्य आहे.आपल्याच पक्षातील सहकाऱ्याचे पंख छाटण्याचा हा प्रकार असल्याचे सांगून तुपकरांची आगीत तेल ओतल्याचे चित्र आहे. विधानसभा निवडणुकीत ‘तटस्थ’ राहिल्यावर आणि निकाल लागून दहा दिवस उलटल्यावर तुपकरांनी आपले मौन सोडून राजकीय वर्तुळात पुन्हा धमाल उडवून दिली आहे. दोन खाजगी वृत्त वाहिन्यांशी बोलतांना त्यांनी आमदार गायकवाड यांचे एकप्रकारे समर्थन करताना कट्टर विरोधक प्रतापराव जाधव यांच्यावर शरसंधान साधले आहे. विधानसभा निवडणुकीत ‘शांत’ राहिल्यावर आणि ८४१ मतांच्या अल्प फरकाने विजयी झाल्यावर आमदार संजय गायकवाड यांनी आपले मौन सोडले.

नुकतेच बुलढाण्यात पार पडलेल्या जाहीर सत्कार सभारंभात त्यांनी, केंद्रीयमंत्री जाधव आणि भाजपा नेते आमदार संजय कुटे यांनी (निवडणुकीत) आपले कामच केले नसल्याचे सांगितले.एवढेच नव्हे तर दोघांनी बुलढाण्यात शिवसेना ठाकरे गटाची उमेदवारी जयश्री शेळके यांना मिळवून दिली, असा गंभीर आरोपही त्यांनी केला होता. मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट)ने आपले कामच केले नसल्याचे सांगून आमदार गायकवाड यांनी मनातील खदखद बोलून दाखविली. यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला. यावर प्रतिक्रिया देताना नामदार जाधव यांनी , बुलढाण्याचा उमेदवार सक्षम होता, त्यांनी माझीच काय मुख्यमंत्री शिंदे यांची प्रचारसभा नाकारली , असा गौप्यस्फोट केला. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील जनता सुज्ञ असून ‘कोणी काय केले’हे त्यांना चांगलंच ठाऊक असल्याचे सांगून त्यांनी आमदाराना डिवचले.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Ladki Bahin Yojna Sudhir Mungantiwar 2100 rs Installment
Ladki Bahin Yojna : लाडक्या बहिणींना २१०० रुपयांसाठी…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

हेही वाचा : गटनेता निवडीच्या बैठकीत अकोल्याला मानाचे स्थान, आ. रणधीर सावरकरांवर…

तुपकर म्हणतात जाधवांना मी ‘कुठेच नको आहे

शिंदे गटातील हा वाद भडकला असतानाच रविकांत तुपकर यांनी आगीत तेल ओतण्याचे काम केले. बुलढाण्यात मोजक्या माध्यम प्रतिनिधी सोबत बोलताना त्यांनी, आमदार गायकवाड आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी केलेल्या गंभीर आरोपात तथ्य आहे. बुलढाणा विधानसभा संदर्भात आमच्या (तुपकर) उद्धव ठाकरे, अन्य नेते, राष्ट्रवादीचे शरद पवार, काँग्रेस समवेत चर्चा झाल्या. उद्धव ठाकरे यांनी ‘एबी फॉर्म’ देण्याचे सूतोवाच करून ‘मतदारसंघात जाऊन या,कार्यकर्त्यांची बैठक घ्या आणि मुंबईत येऊन फॉर्म घेऊन जा’ असे सांगितले.

हेही वाचा : “देवेंद्रजींची मनिषा आम्ही पूर्ण केली, आज त्यांनी आमची…”, कोण म्हणतय असं?

मात्र माझी (उबाठाची) उमेदवारी नक्की झाल्यावर मात्र काही तासांत असे काही घडले की उबाठाची उमेदवारी जयश्री शेळके यांना जाहीर झाली. यामुळे आमदार गायकवाड यांनी उमेदवारी संदर्भात नामदार जाधव यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपात नक्कीच तथ्य आहे. तसेही प्रतापराव जाधव यांना मी राजकारणात ‘कुठेच नको आहे,’ असे सांगून तुपकर म्हणाले की लोकसभा निवडणुकीत मी त्यांच्या विरोधात लढलो.याचा कदाचित त्यांना राग आहे.यामुळे माझी उमेदवारी ठरताच ठाकरे गटाचे पदाधिकारी, काँग्रेसचे एक आमदार एकत्र आले आणि काही तासातच बुलढाण्याची उमेदवारी जयश्री शेळकेंना जाहीर झाली असा दावा तुपकर यांनी बोलून दाखविला. यामुळे आमदार गायकवाड यांच्या आरोपात तथ्य आहे. हे आरोप गंभीर आहे. आपला एखादा सहकारी, चांगले काम करून मोठा होत असेल, शिंदे गटात त्याला मान मिळत असेल तर त्याचे पंख छाटण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप तुपकरांनी या चर्चेत केला आहे.

Story img Loader