बुलढाणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यावर आधारित गीत, चाहत्यांनी फुललेले रस्ते, अधूनमधून होणारी ट्रॅफिक जाम आणि पाहण्यासाठी जमलेले हजारो युवक, असे दृश्य गोविंदाच्या ‘रोड शो’मध्ये पहायला मिळाले. महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ चिखली नगरीत आज संध्याकाळी ८ वाजताच्या सुमारास सिनेअभिनेता गोविंदाचा ‘रोड शो’ पार पडला. यावेळी गोविंदासमवेत खासदार जाधव, आमदार श्वेता महाले उपस्थित होते.

जयस्तंभ चौक येथून ‘रोड शो’ला प्रारंभ झाला. मार्गावरील महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, राणाप्रताप यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून गोविंदा व खासदार जाधव यांनी अभिवादन केले. यानंतर पुढे बाबूलाल चौकमार्गे मार्गक्रमण करणाऱ्या ‘रोड शो’ची सांगता चिखलीचे ग्रामदैवत रेणुका मातेच्या मंदिर परिसरात झाली.

हेही वाचा : दीड लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षल समर्थकास अटक; अनेक हिंसक कारवायांमध्ये सहभाग

आमदार श्वेता महालेंनाही सेल्फीचा मोह

अनेक युवकांनी गोविंदासोबत सेल्फी घेत आपली हौस पूर्ण केली. यादरम्यान प्रचाररथात स्वार आमदार श्वेता महाले यांनाही गोविंदा सोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरला नाही. त्यांनी रथावरच गोविंदासोबत सेल्फी घेतला.

Story img Loader