बुलढाणा : जिल्ह्यातील सुलतानपूर येथील ईदगाहवरील हिरवा झेंडा काढून अज्ञात समाजकंटकाने भगवा ध्वज लावला. यामुळे गावात निर्माण झालेला तणाव पोलीस व गावकऱ्यांच्या सामंजस्याने निवळला. प्रकरणी मेहकर पोलिसांनी ३ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुलतानपूर येथील लोणार मार्गावर इदगाह आहे. त्यावर लावलेला हिरवा झेंडा काढून भगवा झेंडा लावण्यात आला . हिंदु व मुस्लीम या दोन समाजात तेढ निर्माण करण्याची कृती अज्ञात इसमाने केली .

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा…गरम तव्‍यावर बसणारा भोंदूबाबा! महिलेचे लैंगिक शोषण, चित्रफीतसुद्धा…

पोलिसांनी तिघा जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून रविवारी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. शेख अख्तर शेख कौसर (सुलतानपूर) यांच्या तक्रारीवरून मेहकर पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजही गावात पोलीस बंदोबस्त कायम आहे. तपास ठाणेदार राजेश शिंगटे करीत असून आरोपीचा कसून तपास करण्यात येत आहे.