बुलढाणा : यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांसाठी ( मतदारांसाठी) काढण्यात आलेल्या आदेशात सुधारणा करण्यात आली असून आता ८० ऐवजी ८५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना घरपोच मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २३ जानेवारी २०२४ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. मतदार यादीमध्ये ८० ते ११० वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यातील या वयोगटातील मतदारांची संख्या ५९ हजार ६२५ आहे. यापैकी काही जण चक्क शतायुषी आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : “टोईंग व्हॅनमधील युवकांना आवरा हो…”, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहशहरात पोलीस सुरक्षेत करताहेत गुंडगिरी; वाहनचालकाला मारहाण

यातही विशेष म्हणजे ज्येष्ठा मध्ये महिलांची संख्या जास्त म्हणजे ६१ टक्के आहे. ज्येष्ठ मतदारांमध्ये २३ हजार ६१३ पुरूष तर ३६ हजार १३ महिला मतदारांचा समावेश आहे. यातील ८५ वर्षावरील मतदारांना घरपोच मतदानाची सुविधा देण्यात येणार आहे. पात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानाचा पर्याय वापरण्यासाठी ‘फॉर्म १२ डी’ प्रदान केला जाणार आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी व सहाय्यक निवडणूक अधिकारी ही कार्यवाही करणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana senior citizens above 85 years of age can get voting facility at their home scm 61 css