बुलढाणा : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी २००४ च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे, अशी व्यक्त केलेली भावना योग्यच आहे. प्रत्येक पक्षाला असे वाटणे स्वाभाविकच आहे. त्यांचेच काय आम्हालाही वाटते की पुढील वर्षीच्या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांनी या पदाची शपथ घ्यावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गायकवाड म्हणाले की, ज्या पक्षाचा नेता असतो त्या पक्षाच्या प्रमुखां संदर्भात त्याची भूमिका असते. त्यामुळे बावनकुळे यांची भावना योग्यच आहे, त्यात गैर काही नाही. मात्र ज्या पक्षाचे आमदार जास्त निवडून येतील ते आमदारच ठरवतील की मुख्यमंत्री कोणत्या पक्षाचा होणार आहे. मात्र, मला मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे पाहिजेत.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांचा जन्म अन् गडकरी या रुग्णालयात बचावले! राष्ट्रपतींपुढे सांगितला किस्सा…

२८८ आमदार मराठा आरक्षणाला अनुकूल

मराठा आरक्षणाची मागणी केवळ मराठा समाजानेच करावी, ही अपेक्षा वा मागणी चुकीची आहे. मराठा समाजाबद्दल सर्व जाती धर्मांच्या लोकांना आत्मियता आहे. यामुळे विधानसभेतील २८८ आमदार आरक्षणाची मागणी करतील असा आशावाद गायकवाड यांनी बोलून दाखविला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana shivsena mla sanjay gaikwad said that party with more mlas decide the chief minister scm 61 css
Show comments