बुलढाणा : अलीकडच्या काळात विविध कारणांनी गाजत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये आता अजबच घोटाळा उघडकीस आला आहे. रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकानेच वैद्यकीय देयकांवर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सह्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आरोग्य वर्तुळासह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

विशाल तेजराव वाघ असे या बहाद्दर कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. शल्यचिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत वैद्यकीय बिलांमध्ये घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉक्टर साईनाथ वसंतराव तोडकर यांनी शहर पोलिसांत रीतसर तक्रार दिली. त्यानुसार १९ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत विशाल वाघ याने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या देयकामध्ये खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. तसेच खोटे जावक क्रमांक टाकून फसवणूक केली. यावर कळस म्हणजे, काही आजारांच्या बिलांमध्ये शासन निर्णयात नमूद असलेल्या आजारांचा समावेश नसल्याने ही बाब उघडकीस आली. खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट देयके (बिले) तयार करून रुग्णालय प्रशासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आज मंगळवार ( दिनांक २८) दुपारपर्यंत आरोपी विशाल वाघ याला अटक करण्यात आली नव्हती.

Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
security guards at VN Desai Hospital , VN Desai Hospital,
डॉक्टरांच्या आंदोलनानंतर व्ही. एन. देसाई रुग्णालयाच्या सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ, मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबतच्या चर्चेनंतर निघाला तोडगा
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Chennai Doctor Attack
Chennai : कॅन्सरग्रस्त महिलेच्या मुलाचा डॉक्टरवर चाकुने हल्ला; मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
Doctor aggressive after being beaten by relatives The pediatric department of VN Desai Hospital was closed by doctors Mumbai news
नातेवाईकांकडून मारहाण झाल्याने डॉक्टर आक्रमक; व्ही. एन. देसाई रुग्णालयातील बालरोग विभाग डॉक्टरांनी ठेवले बंद

हेही वाचा : विदर्भात उन्हाचा कहर! रेल्वे स्थानकावर मात्र ‘मिस्ट कुलिंग’मुळे गारवा…

तपासात निघणार मोठे घबाड?

या खळबळजनक तक्रारीसंदर्भात बुलढाणा शहर पोलीस ठाण्याचे नरेंद्र ठाकरे यांच्याशी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींनी चर्चा केली. यावर ठाणेदार ठाकरे म्हणाले की, खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट बिलामंधून किती रुपयांचा घोटाळा झाला हे तपासातून समोर येईल. सध्या तपास सुरू आहे, या प्रकरणात आणखी काही घोटाळेबाज कर्मचारी आहेत का? हे उघडकीस येते का हे देखील पहावे लागणार असे ठाणेदार नरेंद्र ठाकरे यांनी सांगितले.