बुलढाणा: लोकसभा निवडणुकीतील जागा वाटप आणि उमेदवारीचा मुहूर्त आता नजीक आला आहे. जागतिक महिला दिनाच्या ८ मार्चच्या आसपास येणारा हा मुहूर्त बुलढाण्याची दीर्घकालीन ‘सामाजिक कोंडी’ फोडणार काय?, असा यक्ष प्रश्न ऐरणीवर आला आहे. साठ दशकांतील लढतीत उपेक्षित असलेल्या महिलांना यंदा तरी ‘दिल्ली साठी’ उमेदवारी मिळणार का हा तो प्रश्न आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१९५७ पासूनच्या आजवरच्या लोकसभा निवडणुकीत एकाही पक्षाने महिलांना उमेदवारी दिली नाही. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतरही हे चित्र कायम राहिले. महिलांच्या सक्षमीकरण मध्ये आघाडीवर असलेल्या काँग्रेसने देखील महिलांना संधी नाकारली. अगदी १९५७ पासून ते बुलढाण्यात काँग्रेसने लढलेल्या सन २००४ च्या अंतिम लढतीपर्यंत पक्षाने महिलांना डावलले!

हेही वाचा…वर्धा : अखेर माजी आमदार अमर काळे लोकसभा लढण्यास तयार, पण…

तत्कालीन भारतीय जनसंघ, रिपब्लिकन पक्ष यांनीही महिलांचा विचार केला नाही. आणीबाणी नंतर स्थापन झालेल्या भाजपने आजवर लढविलेल्या एकमेव लढतीत महिलेचा विचार केला नाही. चार लढतीसाठी एकसंध राष्ट्रवादी, सन १९९६ ते २०१९ पर्यंतच्या सर्व निवडणुका लढविताना शिवसेनेने महिलांचा विचार करण्याची तसदी घेतली नाही. जवळपास ६० वर्षे सुरू असलेली महिलांची राजकीय उपेक्षा २०२४ च्या रणसंग्रामात तरी खंडित होणार काय? हा राजकीय प्रश्न यामुळे ऐरणीवर आला आहे.

हेही वाचा…अकरावीची विद्यार्थिनी गर्भवती निघाली अन ‘ती’ घटना उघडकीस आली…

मागील १६ लढतीत संधी तर सोडाच, पण महिलांच्या उमेदवारीवर चर्चा सुद्धा करण्यात आली नाही. त्या तुलनेत यंदा किमान महिलांच्या उमेदवारीची चर्चा असणे, हाच काय तो माता भगिनींना दिलासा आहे. बुलढाण्याची जागा भाजपला सुटली तर, आमदार श्वेता महाले यांचे नाव आघाडीवर आहे. काँग्रेसला सुटली तर जयश्री शेळके यांना संधी मिळू शकते. किंबहुना शिवसेना (उबाठा) ने जागा काँग्रेसला सोडली तर ते शक्य होईल. तसेच संभाजी ब्रिगेड ला सुटली तर माजी आमदार रेखा खेडेकर यांच्या उमेदवारीचा राजकीय चमत्कार होऊ शकतो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana since 1957 no political party give female candidate in lok sabha elections can this time it happen scm 61 psg