बुलढाणा : तगडा पोलीस बंदोबस्त, एकमेकांसमोर उभे ठाकलेले दोन गट, दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमार, अशा ताणतणावात मलकापूर बाजार समितीच्या सभापती विरुद्धचा अविश्वास ठराव आज बहुमताने पारित झाला. यामुळे बाजार समितीत तणावसदृश्य परिस्थिती असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

बिहारच्या राजकारणात शोभेल, अशा वातावरणात आज बाजार समितीत आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता अविश्वास प्रस्तावा वर चर्चा करन्यासाठीच्या विशेष सभेला सुरुवात झाली. संभाव्य संघर्ष लक्षात घेता बाजार समिती परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहनाना आत येण्यास मनाई होती. संचेती व तायडे गटाचे समर्थक एकमेकांसमोर उभे टाकल्याचे दिसून आले. यावेळी दोन्ही गट हमरीतुमरीवर आल्याचे चित्र होते. घोषणाबाजी, शिवराळ भाषा याने वातावरण ढवळून निघाले. यावेळी संचेती यांच्या भावाची कार फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या धुमश्चक्रीत अचानक तुरळक दगडफेक झाली. दंगा काबू पथक ,पोलिसांनी लाठीमार करीत जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.

hinganghat vidhan sabha constituency
हिंगणघाटमध्ये बंडखोर उमेदवार निर्णायक ठरणार ?
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Dhananjay munde latest marathi news
भाजपमधील दुखावलेले कार्यकर्ते आपल्याकडे वळवण्याचे धनंजय मुंडेंसमोर आव्हान
Arjuni Morgaon Constituency , Ajit Pawar, Manohar Chandrikapure,
विदर्भात अजित पवारांची भाजपकडून कोंडी
Congress candidate Bunty Shelke in Central Nagpur at BJP office during campaigning
काँग्रेस उमेदवार धावत गेला भाजप कार्यालयात…आतमध्ये जे घडले…
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
bjp leader shivray Kulkarni
भाजपचे नाव घेणाऱ्यांनी गल्लीबोळात भाजपविरोधात बैठकी…भाजप प्रवक्त्यांच्या आरोपामुळे…
sangli prithviraj patil
सांगलीतील काँग्रेसअंतर्गत बंडखोरीमागे षडयंत्र, पृथ्वीराज पाटील यांची बंडखोरांसह भाजपवर टीका

हेही वाचा…नागपूरच्या पुरासाठी कारणीभूत; पावसाळा आला तरी कायम

या घटनाक्रम मुळे शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भारतीय जनता पार्टी मधील गटबाजी, दुफळी, मतभेद पुन्हा एकदा वेशीवर टांगल्या गेली आहे. एक वर्षापूर्वी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ सदस्यीय संचालक मंडळाची निवडणूक पार पडली होती भाजपच्या पॅनेलने १७ जागा जिंकत प्रभुत्व सिद्ध केले. सभापती पदी भाजपचे शिवचंद्र तायडे यांची निवड करण्यात आली. मात्र संचेती व तायडे या दोन्ही नेत्यात बिनसले.रावेर लोकसभा निवडणुकीत हे संबंध विकोपाला गेले.

यामुळे भाजपचे एकहाती वर्चस्व असलेल्या बाजार समितीचे सभापती, भाजप नेते शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात भाजपच्याच १४ संचालकांनी मागील २० मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला. आज ३१ मे रोजी सभा पार पडली.

हेही वाचा…वाघ पाहण्यासाठी पर्यटक देतात अतिरिक्त पैसे! पर्यटकांची वाढती संख्या ताडोबा प्रकल्पासाठी डोकेदुखी

भीषण गदारोळात ठराव पारित

या भीषण गदारोळात सभापती तायडे यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव १३ विरुद्ध २ असा पारित करण्यात आला. यावेळी २ संचालक गैरहजर राहिले. एका संचालकाचे निधन झाले आहे.त्यामुळे सध्या १७ संचालक आहेत.