बुलढाणा : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना आज दुपारी कडक पोलीस बंदोबस्तात त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे. ठाणेदार प्रल्हाद काटकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. शनिवारी दुपारी चिखली मार्गावरील तुपकर यांच्या निवासस्थान परीसरातील हालचाली वाढल्या. यानंतर पोलिसांचे एक पथक तिथे दाखल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : वर्धा : तेराव्यासाठी निघालेल्या वृध्द दाम्पत्याचा अपघात, दोन ठार व एक जखमी

यावेळी तुपकर व अधिकाऱ्यात शाब्दिक चकमकी उडाल्या. यानंतर त्यांना शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले.शहरात देखील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. यापूर्वी सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या न्याय हक्काच्या मागण्यांसाठी तुपकर यांनी बुलढाण्यातील एल्गार मोर्च्यात थेट मंत्रालयाचा ताबा घेण्याचा गंभीर इशारा दिला होता. यावरून पोलिसांनी तुपकरांना नोटीस बजावली. मुंबईत आंदोलन करू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे नोटीसमध्ये नमूद आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana swabhimani leader ravikant tupkar detained by police scm 61 css
Show comments