बुलढाणा : रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या चालकास अडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोतवालास ट्रॅक्टरने चिरडले. या कोतवालाचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. यामुळे महसूल विभागासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संग्रामपूर तालुक्यातील कोलद वान नदीपुलाजवळ ही घटना घडली. अवैध रेतीची वाहतुक केली जात असल्याच्या माहिती वरुन महसुल कर्मचारी कोलद वाननदी पुलावर दाखल झाले. कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार यांनी अवैध रेती वाहतुक करणाऱ्या ट्रक्टरला थांबविण्याचा प्रयत्न केला. चालकाने वाहन न थांबविता कोतवाल लक्ष्मण भिकाजी अस्वार (राहणार एकलारा बानोदा, तालुका संग्रामपूर) रेतीने भरलेला ट्रक्टर त्यांच्या अंगावरून नेला. त्यामुळे कोतवाल अस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा…स्टार प्रचारकांच्या सभेची प्रतीक्षाच, आता मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंच्या सभेकडे डोळे….

दरम्यान खळद येथील आरोपी चालक संतोष पारिसे विरूध्द तामगाव पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असल्याची माहिती पोलीसांनी दिली. फिर्यादी देवेंन्द्र श्रीकृष्ण बोडखे यांच्या फिर्यादी वरून आरोपी संतोष पारिसे विरुद्ध खाण व खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. तामगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार राजेन्द्र पवार यांच्या मार्गदर्शनात तपास विलास बोपटे करित आहे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In buldhana tractor crushes kotwal trying to stop illegal sand transportation in sangrampur taluka scm 61 psg