बुलढाणा: गणेश विसर्जन करून परतणाऱ्या वाहनाला भरधाव ट्रकने धडक दिल्याने एक व्यक्ती गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले. यानंतर संतप्त नागरिकांनी ट्रक जाळला. घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला.

हेही वाचा… अमरावती : दिल्लीतून चोरलेल्या कारवर सांगलीच्‍या वाहनाचा क्रमांक, ई-चलान प्रणालीमुळे उलगडा

pune dumper crushed people on footpath
पुण्यात फुटपाथवर झोपलेल्या तिघांना मद्यधुंद डंपर चालकांने चिरडले, तीन जण ठार तर सहा जण जखमी
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Youth killed after being hit by vehicle Mumbai news
वाहनाचा धक्का लागल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या
Two persons standing at bus stop were injured in collision with motor vehicle in Worli on Sunday afternoon
वरळी येथे अपघात सहा जखमी
Murder of youth Govandi , Argument after hit by car,
मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…
Private bus accident at Tamhani Ghat 5 dead and 27 injured
ताम्हणी घाटात खाजगी बस अपघात; ५ जण ठार, २७ जखमी
One killed three injured in Samriddhi Expressway accident after speeding car burst tyres
बुलढाणा : शेगाव दर्शनाची मनोकामना अधुरी! ‘समृद्धी’वर वाहनाचे टायर फुटले; एक ठार, तीन जखमी
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार

हेही वाचा… रावणपुत्र मेघनाथाची एक नाही तर दोन-दोन मंदिरे; लोक म्हणतात, “नवसाला पावणारा…”

२७ सप्टेंबर रोजी मध्यरात्री नंतर ही खळबळजनक घटना घडली. खामगाव शहरातील जनुना बायपास चौफुल्ली जवळ ही दुर्घटना घडली. खामगाव नजीकच्या जनुना तलावात गणरायाचे विसर्जन करून भाविक मालवाहक गाडीने काल रात्री १२ वाजता खामगाव शहराच्या दिशेने येत होते. दरम्यान भरधाव ट्रकने या वाहनाला जनुना बायपास चौफुल्ली जवळ धडक दिली. यामध्ये एकूण ५ जण जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती गंभीर आहे. घटनेमुळे संतप्त नागरिकांनी ट्रक पेटवून दिला . यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाने उत्तररात्रीपर्यंत प्रयत्न करून आग विझविली.

Story img Loader