बुलढाणा : एटीएमचा वापर गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वच करीत असतात. या एटीएमशी संबंधित फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भामटे नवनवीन पद्धतींचा वापर करून लोकांना गंडवत आहेत. तुमची साधी चूक तुम्हाला महागात पडू शकते. त्यामुळे जर तुम्ही पुढल्यावेळी पैसे काढण्यासाठी एटीएमला भेट द्याल, तेव्हा सावधानता बाळगा. कारण भामट्यांनी लोकांची फसवणूक करण्यासाठी नवीन पद्धत शोधून काढली आहे. या पद्धतीचा वापर करून एका भामट्याने बुलढाण्यातील दोघांना लुबाडल्याचे समोर आले आहे. एटीएम वापरकर्त्यांना गंडवण्याची ही पद्धत कोणती? यातून स्वतःचा बचाव कसा करता येईल? याबद्दल जाणून घेऊ या…

एसबीआय शाखा सुंदरखेड येथे पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाचे एटीएम कार्ड बदलून अनोळखी इसमाने फसवणूक केली. अज्ञात इसमाने दोघांना पाऊण लाखाने गंडविल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. बुलढाणा शहर पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात दगडू राम दराखे (८०) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी सुंदरखेड येथे पंजाब नॅशनल बँकेच्या एटीएमकार्ड मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे निघाले नाही. त्यावेळी रांगेत उभे असलेल्या एका अनोळखी इसमाने समोर येवून पैसे काढले. त्यांनतर तो म्हणाला की, “काका तुमचे पैसे निघाले नाही का? मी प्रयत्न करतो.” दराखे यांनी विश्वासाने एटीएमकार्ड दिले. त्या अनोळखी इसमाने एटीएम कार्ड घेवून मशीनमध्ये टाकले आणि पासवार्ड विचारला. त्यांनतर दोनवेळेस प्रयत्न केल्याची बतावणी केली. “तुमचे कार्ड ब्लॉक झाले आहे,” असे म्हणत त्याने एटीएम कार्ड परत केले.

Ajit Gavane statement that distribution of money is defamatory because defeat is visible
भोसरी विधानसभा: पराभव दिसत असल्याने पैसे वाटप केल्याची बदनामी – अजित गव्हाणे
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
scammer pretending to be police officer calls real cop
‘शिकारी खुद यहां शिकार हो गया’, सायबर चोरट्याचा पोलिसाला गंडा घालण्याचा प्रयत्न; नंतर झालं असं काही
Jewellery worth six and half lakhs was stolen from passenger at Swargate ST station
स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा उच्छाद, प्रवासी तरुणाकडील साडेसहा लाखांचे दागिने चोरीला
Congress leader rahul Gandhi rally in nanded
आरक्षणासाठी ५० टक्के मर्यादा तोडू! नांदेडमधील सभेत राहुल गांधींकडून मोदी लक्ष्य
CCTV camera installed in 60 prisons due to inmate attacks and illegal provisions
सुरक्षेचा ‘तिसरा डोळा’बंदच; अंमली पदार्थ, मोबाईलच्या वापरावर नियंत्रण येणार तरी कसे?
manoj jarange patil on babarao lonikar maratha voting statement,
“मराठा मतं बोटांवर मोजण्याइतकी” म्हणणाऱ्या बबनराव लोणीकरांवर मनोज जरांगेंचं टीकास्र; म्हणाले, “त्यांना आता रस्त्यावर…”
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!

हेही वाचा : एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांबाबत मोठी अपडेट, तारखा कधी जाहीर होणार? वाचा…

दराखे घरी गेल्यानंतर त्यांच्या फोनवर दहा हजार रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. त्यांनतर दर दोन मिनिटांनी परत दहा हजार रुपये निघाल्याचे आणि पाचशे रुपये निघाल्याचा संदेश त्यांना मिळाला. त्या ठगाने चार वेळा दराखे यांच्या खात्यातील एकूण ३० हजार पाचशे रुपये काढल्याचे लक्षात आले. त्यानंतर बारकाईने एटीएम कार्ड तपासले असता ते आपले नसल्याचे त्यांना समजले. त्यांच्यासारखीच अर्जुन बधु पवार (रा. देवानगर,ता. लोणार.) यांची सुद्धा फसवणूक झाली होती. विशेष म्हणजे , त्याच अनोळखी व्यक्तीने ४० हजाराने पवार यांनासुद्धा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले. दोघांची मिळून ७० हजाराने फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

हेही वाचा : ‘बालिका वधू…’, अखेरचे मंगलाष्टक सुरू असतानाच लग्नमंडपी असे काही घडले की…

या दोन्ही फसवणूक प्रकरणात एटीएम कार्डधारक गाफील राहिल्यानेच या भामट्याचे फावले. अशी फसवणूक आपली होऊ नये, यासाठी एटीएम सेंटरवर जाताना सावधानता बाळगा, आपले एटीएम कार्ड कोणालाही देऊ नका, पासवर्ड तर कुणालाच सांगू नका.