बुलढाणा : एसटी महामंडळाच्या भंगार बस म्हणजे आता लाखो प्रवाशांच्या सवयीचा भाग झाल्या आहेत. त्यावर कळस ठरणारी आणि अंगावर शहारे आणणारी घटना शेगाव तालुक्यात आज घडली.
हेही वाचा : सोलार इंडस्ट्रीजला वायूदल प्रमुख चौधरी यांची भेट, स्फोटात नऊ कामगारांचा झाला होता मृत्यू
आज शनिवारी (दि. २३ डिसेंबर) कालखेड येथून शेगावकडे राज्य परिवहन महामंडळाची बस (एमएच २८-८७१२) निघाली. गर्दीची वेळ असल्याने बसमध्ये कमीअधिक प्रमाणात ७० प्रवासी होते. वाटेतच या बसची दोन चाके निखळली. यामुळे प्रवासी हादरले. चालकाने कौशल्य व अनुभव पणाला लावून बस थांबविली. यामुळे संभाव्य भीषण अनर्थ टळला. अनेक प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या.