वर्धा: मुसळधार पावसाने शेतात उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पण त्याची भरपाई मिळू शकते. त्यासाठी नुकसान घडल्यानंतर ७२ तासाच्या आत त्याची सूचना विमा कंपनीस द्यावी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतात पाणी साचल्याने, पीक खरडून गेल्याने सोयाबीन पिकाचे प्रामुख्याने नुकसान होवू लागले आहे. विमा संरक्षित पिकाचे नुकसान झाल्यास विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर, मेलवर माहिती द्यावी. विमा कंपनीच्या तालुका कार्यालय, तालुका कृषी कार्यालय तसेच ज्या बँक शाखेत विमा जमा केला, तिथे पूर्वसूचना देणे आवश्यक आहे.

हेही वाचा… “महात्‍मा गांधींचे खरे वडील मुस्लीम जमीनदार”; संभाजी भिडे यांचे खळबळजनक वक्‍तव्‍य

सूचना दिल्यानंतर तात्काळ पंचनामे करता येईल व पिकांच्या झालेल्या नुकसानी बाबत विमा संरक्षण मिळवता येईल, असे कृषी अधीक्षक सूचित करतात. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे व्यक्तिगत स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In case of heavy rain damage to the crops you should notify the insurance company within 72 hours pmd 64 dvr
Show comments