चंद्रपूर : कोरपना-गडचांदुर मार्गावर बुधवार ५ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतक हे कोरपना तालुक्यातील खडकी, रायपुर येथील रहिवासी होते. समीर मडावी व प्रियांका झित्रु कुलसंगे असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात हा सोनूर्ली गावाजवळ घडला. समीर व प्रियंका गडचांदूर येथे बँकेत काही कामानिमित्त आले होते.

हेही वाचा : अमरावती : ‘इव्हीएम’वरील बटन दाबताना चित्रफित काढणे भोवले

Seven cow and Buffaloes died due to lightning in Pisvali near Dombivli
डोंबिवलीजवळील पिसवलीत विजेच्या धक्क्याने सात जनावरांचा मृत्यू
Mumbai Goregaon accident marathi news
मुंबई: उड्डाणपुलावरून २० फूट खाली कोसळून दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
MotorCyclist dies in an accident in CIDCO
सिडकोतील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
school boy killed in leopard attack in shirur
शिरूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात शाळकरी मुलाचा मृत्यू
Nandurbar,Highway Blocked as Two Teens Die, bakri eid, Two Teens Die Six Injured Dumper Collision, Ambulance Delay Sparks Outrage,
नंदुरबार : बकरी ईदसाठी जात असताना अपघातात दोघांचा मृत्यू, सहा जण जखमी
Death toll in Chamundi Company blast rises to eight
चामुंडी कंपनी स्फोटातील बळींची संख्या आठवर, जखमी कामगाराचा मृत्यू , एकावर उपचार
Fire, apartment, building,
ठाण्यातील उंच इमारतीतील सदनिकेत आग, कुटुंबियांना वाचविताना एकाचा मृत्यू
Two farmers died due to lightning strike in Akola district
अकोला जिल्ह्यात वज्राघाताने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू

दोघे दुचाकीने परतीच्या वाटेवर असताना कोरपना-गडचांदूर मार्गावरील सोनूर्ली गावाजवळ समोरून कोळसा वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम.एच.३४ ए.बी.११७३) याने समोरून समीरच्या दुचाकीला धडक देत तब्बल ५० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. अपघात इतका भीषण होता की दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल. अपघातस्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे, रस्ता खराब असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने नियंत्रित गतीमध्ये वाहन चालवितात. मात्र कोळसा वाहतूक करणारे ट्रक चालक हे बेभान होत वाहन चालवितात.