चंद्रपूर : कोरपना-गडचांदुर मार्गावर बुधवार ५ जून रोजी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृतक हे कोरपना तालुक्यातील खडकी, रायपुर येथील रहिवासी होते. समीर मडावी व प्रियांका झित्रु कुलसंगे असे मृतकाचे नाव आहे. हा अपघात हा सोनूर्ली गावाजवळ घडला. समीर व प्रियंका गडचांदूर येथे बँकेत काही कामानिमित्त आले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा : अमरावती : ‘इव्हीएम’वरील बटन दाबताना चित्रफित काढणे भोवले

दोघे दुचाकीने परतीच्या वाटेवर असताना कोरपना-गडचांदूर मार्गावरील सोनूर्ली गावाजवळ समोरून कोळसा वाहतूक करणारा ट्रक (क्र. एम.एच.३४ ए.बी.११७३) याने समोरून समीरच्या दुचाकीला धडक देत तब्बल ५० मीटर अंतरापर्यंत फरफटत नेले. अपघात इतका भीषण होता की दोघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाल. अपघातस्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. मागील अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू आहे, रस्ता खराब असल्याने दुचाकी व चारचाकी वाहने नियंत्रित गतीमध्ये वाहन चालवितात. मात्र कोळसा वाहतूक करणारे ट्रक चालक हे बेभान होत वाहन चालवितात.