चंद्रपूर : तांत्रिक बिघाडामुळे महाऔष्णिक वीज केंद्रातील ५०० मेगावॉटचा संच क्रमांक ५ पुन्हा एकदा बंद पडला आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्ष दीड वर्षापासून हा संच सातत्याने बंद पडत आहे. भेलचे अभियंते हा संच दुरुस्ती करण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात विजेची मागणी वाढली असताना चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रातील ५०० मेगावॉटच्या संच क्रमांक ५ ला तांत्रिक बिघाडाचे ग्रहण लागले आहे. हा संच गेल्या सहा महिन्यांपासून बंद होता. काही महिन्यांपूर्वीच हा संच पुर्ववत सुरू झाला. मात्र दोन दिवसापूर्वी टरबाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा संच बंद करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा : उपनिबंधक वैशाली मिटकरी यांना दहा हजारांची लाच स्वीकारताना अटक

५०० मेगावॉटचा संच बंद झाल्यामुळे वीज उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे. हा संच दुरुस्तीसाठी भेल कंपनीचे अभियंता येथे दाखल झाले आहेत. त्यांच्या माध्यमातून संच दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र तरीही संच सुरू होण्यास किमान १५ ते २० दिवसांचा कालावधी लागेल असे सांगण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur 5 th set of 500 megawatt shut down due to technical glitch affects power generation rsj 74 css