चंद्रपूर: शहरातील सर्व रस्त्यांवर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे अपघात देखील झाले आहे. मात्र याकडे बांधकाम विभाग तथा महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील खड्ड्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव देत खड्ड्यात वृक्षारोपण रोपण करण्यात आले.आम आदमी पार्टीने केलेले हे अनोखे आंदोलन लक्षवेधी ठरले. विशेष या खडयांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर शहरातील मुख्य मार्गात खड्डेच खड्डे आहेत.या मार्गांवरून प्रवास करणे जिकरीचे झाले आहे. असे असले तरी या महत्वाचा प्रश्नाकडे राजकीय नेत्यांचे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. खड्ड्याच्या या प्रशांनावर आम आदमी पक्षाने आगळे वेगळे आंदोलन करीत लक्ष वेधले. शहरातील विविध भागात असणाऱ्या खड्ड्यात वृक्षारोपण करण्यात आले. विशेष म्हणजे या खड्ड्याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव देण्यात आले.

हेही वाचा… नागपूर: गर्भवती तरुणीवर प्रियकर करायचा बलात्कार; प्रेयसीचा आत्महत्येचा प्रयत्न

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव खड्ड्याना देऊन संताप व्यक्त करण्यात आला. यावेळी आपचे नेते मयूर राईकवार, महानगर अध्यक्ष योगेश गोखरे, शेतकरी आघाडी जिल्हाध्यक्ष दिपक बेरशेट्टीवर, सहकार आघाडी जिल्हाध्यक्ष मधुकर साखरकर, चंद्रपूर महानगर युवा अध्यक्ष संतोष बोपचे, चंद्रपूर महानगर उपाध्यक्ष सुनील सदभाय्या, चंद्रपूर महानगर सह संघटन मंत्री सिकंदर सागोरे, चंद्रपूर महानगर सहसचिव सुधीर पाटील, चंद्रपूर महानगर कुषाध्यक्ष स्वप्निल घागरगुंडे, तुकूम वॉर्ड १ संघटन मंत्री भीमराव मेंढे आदी कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In chandrapur aam aadmi party protested by naming the potholes after chief minister eknath shinde rsj 74 dvr
Show comments