चंद्रपूर : ब्रम्हपुरी वन विभागात तीन जणांचा बळी घेणाऱ्या वाघिणी पाठोपाठ तिचा साथीदार नर वाघही सोमवारी सकाळी आठच्या सुमारास जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले. गेल्या आठवड्यात लागोपाठ तीन घटनांमध्ये वाघाच्या हल्ल्यात तिघांना जीव गमवावा लागल्याची माहिती आहे. २९ ऑक्टोबर रोजी पळसगाव वन परिक्षेत्रातील बेलारा येथे एका मेंढपाळाचा वाघाने बळी घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा खडसांगी वन परिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी हळदा गावातील सैत्राबाई नामदेव कामडी (७०) या महिलेला ब्रह्मपुरी वनविभागाच्या आवळगाव उपक्षेत्रातील हळदा बीटमधील कंपार्टमेंट क्रमांक ११६८ मध्ये शेतात भात कापणी करत असताना वाघाने ठार केले. वनविभागाने कॅमेरा ट्रॅप बसवल्यानंतर या हळदा घटनेत वाघाचे दोन मोठे पिल्ले सामील असल्याची माहिती मिळाली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा