चंद्रपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार गैरबौद्ध हिंदूपासून मुक्त करावे व या विहाराचे प्रबंधन बौद्धांकडे सोपविण्यात यावे, तसेच १९४९ चा बुध्दगया मंदीर कायदा रद्द करावा या मागणीसाठी चंद्रपुरात सर्व प्रमुख बुद्ध – फुले – आंबेडकरी पक्ष -संघटनांच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख बुद्ध – फुले – आंबेडकरी पक्ष -संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भदंत धम्मघोष मेत्ता यांचे अध्यक्षतेखालील या आंदोलनात प्रचंड आक्रोश निदर्शनास आला . मंदीर, मस्जिद, गुरुद्वारा , चर्च इत्यादींचे प्रबंधन अनुक्रमे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांचेकडे असते. परंतु बुद्धगया मंदीर कायद्यान्वये बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे युनेस्को नुसार बौद्धांचे जागतिक धरोहर असून सुद्धा ते बौद्ध ऐवजी हिंदूंच्या ताब्यात आहे , हे संविधानाच्या कलम १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन आहे . या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्याने सम्राट अशोकाने निर्माण केलेले हे महाविहार जागतिक बौद्धांच्या आस्थेचा आणि अस्मितेचा विषय आहे , म्हणून आता कोणत्याही परिस्थितीत हे महाविहार मुक्त झालेच पाहिजे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या .
वंचितचे नेते तथा बहुजन हितकारिणी सभेचे संस्थापक अध्यक्ष बंडू उर्फ नागवंश नगराळे यांचे मुख्य संयोजनात आंबेडकरी चळवळीतील दिग्गज दिलीप वावरे, देशक खोब्रागडे, खुशाल तेलंग, प्रतिक डोर्लीकर, तनुजा रायपूरे, अॅड. रवींद्र मोटघरे, मृणाल कांबळे, अंकुश वाघमारे, धम्माचारी रत्ननायक, भन्ते अनिरुद्ध, एन. डी. पिंपळे, अशोक निमगाडे, अशोक टेंभरे, अशोक फुलझेले, प्रेमदास बोरकर, सुरेंद्र रायपूरे, हरीश दुर्योधन, उषा तामगडे, संघमित्रा खोब्रागडे, इ. नी मार्गदर्शन केले . संचालन युवा नेते सुरेश नारनवरे यांनी तर आभार सिद्धांत पुणेकर यांनी मानले. बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे पुतळा परिसरात बुद्ध, फुले, आंबेडकरी सर्व पक्ष – संघटना एकवटल्याने पुढे या विषयावर मोठे आणि तीव्र आंदोलन उभे व्हावे असा आग्रह मृणाल मेश्राम, भाष्कर भगत, गौतम तोडे, राजेश वनकर, विद्याधर लाडे, घनश्याम वनकर, संतोष डांगे, राजश्री शेंडे, कोमल रामटेके,हंसराज वनकर, राजू भगत, भानेश चिलमील, शंकर वेल्हेकर, सुधाकर पाटील इ. नी केले. शेवटी दिलीप वावरे यांचे नेतृत्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन दिली.