चंद्रपूर : बुद्धगया येथील महाबोधी महाविहार गैरबौद्ध हिंदूपासून मुक्त करावे व या विहाराचे प्रबंधन बौद्धांकडे सोपविण्यात यावे, तसेच १९४९ चा बुध्दगया मंदीर कायदा रद्द करावा या मागणीसाठी चंद्रपुरात सर्व प्रमुख बुद्ध – फुले – आंबेडकरी पक्ष -संघटनांच्यावतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व प्रमुख बुद्ध – फुले – आंबेडकरी पक्ष -संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भदंत धम्मघोष मेत्ता यांचे अध्यक्षतेखालील या आंदोलनात प्रचंड आक्रोश निदर्शनास आला . मंदीर, मस्जिद, गुरुद्वारा , चर्च इत्यादींचे प्रबंधन अनुक्रमे हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन यांचेकडे असते. परंतु बुद्धगया मंदीर कायद्यान्वये बुद्धगया येथील महाबोधी महाविहार हे युनेस्को नुसार बौद्धांचे जागतिक धरोहर असून सुद्धा ते बौद्ध ऐवजी हिंदूंच्या ताब्यात आहे , हे संविधानाच्या कलम १३, १४, १५, २५, २६ चे पूर्णतः उल्लंघन आहे . या ठिकाणी गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्त झाल्याने सम्राट अशोकाने निर्माण केलेले हे महाविहार जागतिक बौद्धांच्या आस्थेचा आणि अस्मितेचा विषय आहे , म्हणून आता कोणत्याही परिस्थितीत हे महाविहार मुक्त झालेच पाहिजे अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या .
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा