लोकसत्ता टीम
चंद्रपूर: शुक्रवार, ५ मे रोजी भारतातून दिसलेले छायाकल्प चंद्रग्रहण पावसाने व्यत्यय न आनल्याने देशातील आणि विशेषतः विदर्भातील खगोल प्रेमींना चांगल्या पद्धतीने पाहता आले. स्काय वॉच ग्रुपने ग्राहणाची माहिती आणि पाहण्यासाठी आवाहन केले होते.
भारतातुन दिसलेले हे ह्या वर्षीचे पहिलेच ग्रहण असल्याने बहुतेक लोकांनी ह्या ग्रहणाचा निरीक्षण करून आनंद साजरा केला. ह्या ग्रहणात चंद्र पृथ्वीच्या उपछायेतून (Penumbra) गेला असल्याने चंद्र किंचित अंधुक होताना पहिला. पृथ्वीची गडद छाया डावीकडे असल्याने चंद्राची डावी बाजू जास्त काळी जाणवत होती म्हणूनच त्याला छायाकल्प चंद्रग्रहण म्हणतात. अगदी असेच चित्र ५ मे रोजी रात्री आकाशात पहायला मिळाले.
हेही वाचा… अकोला: धान्यांऐवजी थेट रक्कमेच्या योजनेची अंमलबजावणी रखडली
ग्रहण कसे घडते
जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वी एका रेषेत येते तेव्हाच चंद्र-सूर्य ग्रहणे होतात.चंद्र ग्रहनवेळी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये पृथ्वी येते आणि म्हणून पृथ्वीची सावली चंद्रावर पडते. पृथ्वीच्या दोन प्रकारच्या सावल्या असतात. गडद सावली आणि उपछाया, गडद सावलीतून चंद्र गेल्यास खग्रास तर उप छायेतून गेल्यास छायाकल्प चांद्रग्रहण घडते.
हे छायाकल्प चंद्रग्रहन या आशिया, आस्ट्रेलिया, युरोप, पूर्व आफ्रिका, पेसिफिक, इंडीयन आणि अटलांटिक महासागरातून अनेकांनी पाहिले. भारतातून ग्रहणाला स्थानिक वेळेच्या फरकाने भारतीय वेळेनुसार ८.४४ वाजता सुरवात झाली. ग्रहणमध्य १०.५२ तर ग्रहण समाप्ती १.१ वाजता झाली. स्काय वॉच ग्रुपच्या आवाहनानंतर विदर्भातील लाखो नागरिक, विद्यार्थ्यांनी छायाकल्प चंद्र ग्रहण निरीक्षण केले अशी माहिती स्काय वॉच ग्रुपचे सुरेश चोपणे यांनी दिली.